Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विकासाच्या बाबतीत नांद्रे गाव आदर्श बनवू,सुधीरदादा गाडगीळ: गावात प्रचार फेरी ;संवाद सभा

विकासाच्या बाबतीत नांद्रे गाव आदर्श बनवू सुधीरदादा गाडगीळ: गावात  प्रचार फेरी ;संवाद सभा
 

सांगली,दि. १३: नांद्रे गावात गेल्या  गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत. उर्वरित सर्व कामे पूर्ण करून हे गाव विकासाच्या बाबतीत आदर्श बनवू, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.

नांद्रे येथे प्रचारफेरी  आणि संवाद सभा यासाठी आमदार गाडगीळ आले होते. हे कार्यक्रम माजी पंचायत समिती सदस्य राहुल  सकळे यांनी तसेच ग्रामस्थांनी आयोजित केले होते.ग्रामस्थांनी सुधीरदादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या जल्लोषात सहर्ष स्वागत केले. गावात मार्गावरून प्रचारफेरी काढण्यात आली.  घरोघरी माहितीपत्रके वाटण्यात आली.  चौकाचौकात दादांचे औक्षण करून सहर्ष स्वागत झाले. 
सुधीरदादा यांच्यासमवेत प्रचार फेरीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे तसेच गावातील मान्यवर नागरिक सहभागी होते. वाटेत ठिकठिकाणी सुधीरदादांना घरी बोलावून नेण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मातंग समाज संघटनेच्या कार्यालयास तसेच मातोश्री रमाई विहार येथेही भेट दिली.श्री दत्त ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस भेट देऊन तेथे पदाधिकारी आणि सभासदांची चर्चा केली. 

जिनेश्वर पाटील यांच्या वाड्यास दादांनी भेट दिली. यावेळी जिनेश्वर पाटील म्हणाले, आमची आणि सुधीरदादांची ओळख जुनी आहे. दादा म्हणजे अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व आहे. ते प्रामाणिक, चारित्र्यवान आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत.गेल्या दहा वर्षात त्यांनी विकास कामे प्रचंड केलेली आहेत. त्यामुळे यावर्षीसुद्धा नांद्रे गावातून आम्ही मोठे मताधिक्य देणार आहोत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वीरभद्र मंदिर, अंबिका देवी मंदिर येथे सुधीरदादांनी  दर्शन घेतले.तसेच या मंदिरांचे बांधकाम तसेच जीर्णोद्धार याबाबत चौकशी केली. आवश्यक तेथे मदतीचे आश्वासनही दिले. सुधीरदादांनी गावातील इतिहास प्रसिद्ध दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. प्रचार फेरीत माजी पंचायत सदस्य राहुल सकळे, सरपंच महेश पाटील, सतीश हेरले, गुंडू पाटील, शितल पाटील, शीतल सकळे, सुभाष पाचोरे, सागर माने, पिंटू पाटील, महावीर चिंचवाडे, दीपक पाटील, मोहसीन मुल्ला, शत्रुघ्न सुतार, महावीर भिलवडे यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो 
 
1) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे नांद्रे येथे प्रचार फेरी आणि  संवाद सभेसाठी आगमन होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
2) सांगली :आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे नांद्रे येथे घरोघरी महिलांनी औक्षण केले.
 
3) सांगली: नांद्रे येथे प्रचार फेरीच्या दरम्यान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
 
4) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी नांद्रे येथे काढलेल्या प्रचार फेरीस  ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.