सांगली दि.१०: पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या दहा वर्षांत सांगलीसाठी खूप काम केले आहे. ते संविधान संरक्षक आहेत. सांगलीची अस्मिता व अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, सांगलीकरांना चांगले रस्ते, गटारी, शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना निवडून आणण्यासाठी जयहिंद सेना गुंठेवारी चळवळीच्या वतीने जाहीर पाठिंबा पृथ्वीराज पाटील यांच्या मारुती चौकातील प्रचार सभेत देण्यात आला आहॆ.
यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून हजारोंच्या संख्येने शिवाजी पुतळा येथुन मारुती चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात जयहिंद सेना गुंठेवारी चळवळ यांचे वतीने पाठिंबा पत्र दिल्याचे गुंठेवारी चळवळीचे जनक व जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांचे पाठिंबा दर्शक भाषणही झाले. पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
महेश मासाळ, विजय बल्लारी, शंकर तुपे विश्वनाथ तुपे, पै. रणजीत चव्हाण, मारुती घुटूगडे, युवराज मोने, पदाधिकारी व व गुंठेवारी चळवळीतील कार्यकर्ते व जयहिंद सेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.