पती-पत्नी प्रत्येक वेळी खरेदी करायचे आलिशान कार, मग स्वस्तात विकूनही व्हायचे मालामाल, युक्ती जाणून पोलीस थक्क
एक धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशातील नोएडामधून समोर आलीय. पती-पत्नी वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाडी विकत घ्यायचे आणि काही दिवसात एका नवीन गाडी ऐवजी दुसरी नवीन गाडी त्यांच्या घरासमोर दिसायची. कारण ते पहिले तर गाडी विकत घ्यायचे मग ती स्वस्तात विकून भरपूर पैसा मिळवायचे आणि आलिशान आयुष्य जगायचे. शोरूमच्या व्यक्तीने या पती पत्नीची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली पण पत्नी अद्याप फरार आहे.
झालं असं की, शोरूमच्या तक्रारीवरून या पती पत्नीचा मोठा भांडा फुटला. चेक क्लिअरन्सचा बनावट संदेश दाखवून शोरूममधून 26 लाख रुपये किमतीचे टाटा सफारी विकत घेतली. त्यानंतर तो व्यक्ती फरार झाला, शोरूमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकाला शुक्रवारी अटक केली. या फसवणुकीप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये आरोपीच्या पत्नीचेही नाव आहे. पोलिसांची दोन पथके महिलेच्या शोधार्थ संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत. ज्या दिवशी या जोडप्याने 26 लाख रुपयांचा चेक दिला तेव्हा त्यांच्या खात्यात फक्त 995 रुपये होते. कंपनीच्या अंतर्गत लेखापरीक्षणात ही फसवणूक आढळून आली. आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत.बनावट पेमेंट दाखवून या जोडप्याने टाटा सफारीची डिलिव्हरी घेतली. त्यानंतर सागर मोटर्सने केलेल्या तपासात राजदेवने दिलेला चेक क्लिअर झाला नसल्याचे समोर आले. आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर एजन्सीला दाखवलेला मेसेजही बनावट निघाला. चेक क्लिअरन्स दरम्यान, टाटा मोटर्सच्या बँक खात्यात थोडक्यात पैसे भरले गेले. याचा फायदा घेत आरोपींनी सफारीची डिलिव्हरी घेतली. मात्र, आरोपीच्या खात्यातून सागर मोटर्सच्या खात्यावर कोणत्याही प्रकारची रक्कम जमा झाली नाही.
एसीपी शैव्य गोयल यांनी सांगितले की, राजदेव त्यांची पत्नी कोयल देव क्लियो काउंटी सोसायटीमधील फ्लॅटमध्ये राहते. फ्लॅटचे भाडे 55 हजार रुपये आहे. दोघेही नवरा बायको सेक्टर-63 मध्ये देवेक्स नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालवायचे. या जोडप्याने गेल्या वर्षी 10 ऑगस्ट रोजी सेक्टर 5 येथील सागर मोटर्समधून 11 हजार रुपये भरून टाटा सफारीचे ऑनलाइन बुकिंग केलं होतं. या दाम्पत्याने सागर मोटर्सच्या नावाने खासगी बँकचा चेक दिला. फसवणुकीचे नियोजन करून दोघांनीही तत्काळ चेक परत करून सागर मोटर्सच्या खात्यात 26 लाख रुपये भरल्याचा बनावट मेसेज तयार केला.
कंपनीच्या अंतर्गत अहवालात संपूर्ण फसवणूक उघडकीस आल्यानंतर राजदेव आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध फेज वन पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. शुक्रवारी मुख्य आरोपी राजदेव याला पोलिसांनी पकडले. पतीच्या अटकेची माहिती मिळताच पत्नी फरार झाली. चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीसोबत यापूर्वीही अशीच फसवणूक केली होती.
यापूर्वी, या जोडप्याने राणा मोटर्स नोएडा येथून ग्रँड विटारा आणि नजफगड रोड दिल्ली गॅलेक्सी टोयोटा येथून टोयोटा हिलक्स कारची डिलिव्हरी घेतली आहे. या दोघांनी 22 लाख रुपयांची ग्रँड विटारा आणि 30 लाख रुपयांची टोयोटा हिलक्स अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. नोएडा येथून फसवणूक करून खरेदी केलेली 26 लाख रुपयांची टाटा सफारी आरोपींनी 12 लाख रुपयांना विकली आहे. सफारी दिल्लीतील ललित कुमार दीक्षित नावाच्या व्यक्तीला एका डीलरमार्फत विकण्यात आली होती. हे दोघे पती-पत्नी बनावट मेसेजच्या आधारे फसवणूक करतात आणि कार खरेदी-विक्री करतात, असे पोलिसांच्या तसात उघड झालं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.