Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयश्री पाटील यांची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांच्या फायद्याची?

जयश्री पाटील यांची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांच्या फायद्याची?
 

सांगली मागील दोन  निवडणुका  मध्ये सुधीर गाडगीळ  यांची घटलेली मतांची टक्केवारी , जरांगे फॅक्टर, भाजपमधील धर्माधं शाऊटीगं ब्रिगेडमुळे अस्वस्थ मुस्लिम मतदार, मागील निवडणूकीमध्ये वसंतदादा घराण्याने बजावलेली भुमिका यामुळे जयश्री मदन पाटील यांची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना फायदयाची ठरण्याची शक्यता आहे.

सन 2014 मध्ये सुधीर गाडगीळ 14,457 मतांची आघाडी घेऊन निवडून आले होते तर 2019मध्ये 6939 मतानी विजयी हाले होते. 2014 मध्ये त्यानां 80497 मते तर  काँग्रेसचे मदन पाटील यांना 66040 आणि पृथ्वीराज एवार याना 34635 मते मिळाली होती.तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून माजी  महापौर सुरेश पाटील यानी निवणुक लढविली होती त्यांना 4718 मते मिळाली होती, या निवडणूकीत  गाडगीळ  यांच्या विरोधातील तीन उमेदवारांची मतांची बेरीज 1,05,386 इतकी होती.म्हणजे गाडगीळ यांच्यापेक्षा ती मते जास्त होती. मदन पाटील व पृथ्वीराज पवार  यांच्या मत विभागनीचा फायदा गाडगीळ याना झाल होता. गाडगीळ यांची ही पहिलीच निवडणूक होती जिल्ल्याच्या राजकारणातील सौदागरने पडदया मागून त्यांची पूर्ण ताकद गाडगीळ यांच्या मागे उभी केल्याने गाडगीळ विजयी झाल्याचे सर्व ज्ञात आहे.
सन 2019 च्या निवडणुकीत गाडगीळ यांना 93636  मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज पाटील यांना 86697 मते मिळाली होती. गाडगीळ हे 6939 मतानी विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये 12  उमेदवार उभे होते. अपक्ष व नोटा यांना  मिळालेली मते 8350 होती. म्हणजे गाडगीळ यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा ही मते जास्त होती. ऐकून मताच्या 49.63 टक्के मते गाडगीळ यांना तर 45.95 टक्के मते पृथ्वीराज पाटील यांना मिळाली होती.

मागील निवडणुकीत सुधीर गाडगीळ  यांनी निसटता विजय मिळविला होता. आताच्या निवडणुकीमध्ये समीकरणे बदलली आहेत मागील निवडणुकीच्यावेळी इच्छुक असलेल्या जयश्री पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारलेली होती. एकदा पृथ्वीराज पाटील आमदार झाले तर पुढील 3- 4 टर्म आपल्या घराण्यात आमदारकी येणार नाही. असा समज वसंतदादा घराण्यातील काही लोकांना झाला. त्याचा परिणाम म्हणून दादा घराण्यातील बहुसंख्य नेत्यांनी निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिले व निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पृथ्वीराज पाटील यांचा करेकट्ट कार्यक्रम केला. मदन पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील या गटाने सुधीर गाडगीळ यांना छुपी मदत केल्याचा आरोप होत आहे.

सन 2014 नंतर राज्यात व देशात भाजपाची लाट होती.  विरोधीपक्षातील  बड़े-बड़े दिगग्ज नेते भाजप मध्ये प्रवेश करीत होते. तर काहीजण भाजपच्या विरोधात  बोलण्याचे धाडस करत नव्हते. या काळामध्ये पृथ्वीराज पाटील यांनी सांगली, मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले, त्यामुळे मागील विधानसभा निवडणूकीनंतर पृथ्वीराज पाटील यांची ताकद वाढल्याचे दिसते.त्यांच्यामुळे या परिसरात काँग्रेस पक्ष जिवंत राहिला असे बोलले जाते.

विशाल पाटील यांना लोकसभेमध्ये मिळालेले हे  त्यांचे व्यक्तिगत येत नाही. माजी खासदार संजय पाटील यांना असलेला विरोध, जिल्यातील विविध विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवाराची मोट बांधण्यात आलेले यश,देशपातळीवर मोदी यांच्या कार्यपध्दतीवर असलेली नाराजी यामुळे विशाल पाटील विजयी होऊ शकले.या निवडणूकीमध्ये तोच सांगली फॅक्टर वापरण्यात येत आहे. परंतू लोकसभा निवडणुकीतील व आताच्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थितीमध्ये मोठा फारक आहे. लोकसभेच्यावेळी अनाहूतपणे मिळालेले यश पुन्हा विधानसभा निवडणूकीत मिळू शकेल या अंदाजाने विशाल पाटील यांनी बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांना पाठींबा दिला  परंतु लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सांगली फॅक्टर यशस्वी होण्याची शक्यता नाही. जयश्री पाटील याचे काँग्रेस पक्ष संघटनेमधील काम नसल्यासारखे झाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील प्रचारामध्ये प्रथम  बाहेर पडले. त्यानंतर आता स्वतःच्या प्रचारासाठी बाहेर  पडले असा आरोप होत आहे, पक्ष संघटणेमध्ये त्यांचे कार्यकर्ते नसल्यासारखेच आहे.केवळ निवडणुकीपुरतेच ते बाहेर पडत असतात. असा आरोप होत आहे.
अन्यवेळी पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमात अथवा पक्ष बांधंणी मध्ये सहभाग दिसून येत नसल्याचे आरोप होत आहेत.स्व. वसंतदादा  यांच्या निधनाला ३५ वर्षे झाली. स्व. दादांनी ज़िल्यामध्ये सहकार रुजवला व वाढवला. वसंतदादा बँक बंद पडली, ग्राऊडनट सोसायटी बंद पडली. वसंतदादा साखर कारखाना भाडोत्री पद्धतीने चालविण्यास दिला, कृषीउत्पन्न बाजार समिती कशीबशी सुरु आहे. स्व. दादांनी सुरु केलेल्या अनेक मोठ्या संस्था त्यांच्या वारसदारांनी बंद पाडल्याचा आरोप होत आहे.

भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यानां राजकीय फायदा करून देण्यासाठी त्यांची बंडखोरी असल्याचा आरोप होत आहे, पक्ष संघटनेत त्यांचे अथवा त्याचे कार्यकत्यांचे योगदान नसल्याने त्यांच्या पचार यंत्रणेमध्ये स्व . मदन पाटील यानां मानणारे  काही माजी नगरसेवक व त्याच्यामुळे राजकीय व आर्थिक दृष्टया मोठे झालेले मधल्या फळीतली काही कार्यकर्ते व पै - पाहुण्यांचा याचा सहभाग दिसतो. पदमाळ, कर्नाळ, माधवनगर व बुधगांव या गावामध्ये स्व. मदन पाटील यांचे अनेक नातेवाईक आहेत. या ग्रामीण परिसरात नातेवाईकांची राजकीय पकड आहे.
 
यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा तर्क जयश्री पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. सांगली मतदार संघामध्ये 3,56,410 मतदार आहेत यामध्ये मुस्लीम, मागासवर्गीय मतदारांची संख्या लाखांहून अधिक आहे. भाजपचे धर्मांध शाऊटिंग ब्रिगेडमधील निलेश राणे व अन्य नेत्यांचा मुस्लीम विरोधी चिथावणीखोर भाषणामुळे मुस्लिम मतदारामध्ये अस्वस्थता त्याचा परिणाम म्हणून ही मते भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या विरोधात असणारे पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील याच्याकडे वळण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज पाटील हे  काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याने या मतांचा फायदा त्यानाचं होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगेच्या यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मराठा समाज ऐकवटल्याने इतर मागासवर्ग समाजात अस्वस्थाता निर्माण झाली आहे. इतर मागासवर्गीय समाज तुलनेने एकजूट नसल्याने या समाजाची मते काँग्रेस, भाजप व बंडखोर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसापासून भाजप बहुमताच्या जोरावर राज्यघटना बदलणार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. याचा परिणाम म्हणून सुशिक्षीत मागासवर्गय मतदार भाजपापासून दूर जातांना दिसत आहे.

संभाव्या इच्छुकांची कोंडी होणार
बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारामध्ये अनेक माजी नगरसेवक  तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी  इच्छुक दिसून येतात.परंतू जयश्री पाटील या बंडखोर उमेदवार असल्याने येत्या निवडणुकीमध्ये त्या इच्छुकांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काही इच्छुक दोन्ही उमेदवारांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.

जिल्यातील काँग्रेसचा एक आमदार वाढला तर संभाव्य मंत्रीमंडळात आपले स्थान आणखी भक्कम होईल म्हणून विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांना पूर्ण ताकद दिली आहे.आता पर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तिन्ही प्रमुख उमेदवार खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहेत निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात देखील ते कमी  पडणार नाहीत.
जिल्याचा चा सौदागर करणार किंगमेकर 

जिल्ह्याच्या सौदागरने सुधीर गाडगीळ यांना सर्व प्रकारची रसद पुरवून प्रथम आमदार केले. नंतर दुसऱ्या टर्मला गाडगीळ यांनी स्वता:ची ताकद वाढवून निसटता का होईना विजयी होऊन आमदार झाले. आजच्या स्थितीत जयश्री पाटील यांची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांच्या फायदयाची ठरणार असली तरी उपद्रवमूल्य असणाऱ्या ' 'या ' सौदागरने शेवटच्या क्षणी काही  ' करामत' केली तर सांगली विधानसभेचा निर्णय काहीही होऊ शकतो.
 
विकास गोंधळे 
संपादक, सांगली दर्पण

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.