Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पदमाळेत पर्यटनक्षेत्र विकसित करणार :,सुधीरदादा गाडगीळ गावात उत्साहात प्रचारफेरी

पदमाळेत पर्यटनक्षेत्र विकसित करणार सुधीरदादा गाडगीळ ; गावात उत्साहात प्रचारफेरी
 
 
सांगली, दि. १७: पदमाळे या गावात गेल्या दहा वर्षात भरपूर विकास निधी मी दिला आहे. अजूनही काही कामे राहिली असतील ती पूर्ण करू.तसेच कृष्णा काठावरील हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येईल, असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले.

आमदार गाडगीळ यांनी आज पदमाळे येथे प्रचार फेरी काढली. त्यावेळी त्यांनी  पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करून गावाचा कायापालट करू अशी ग्वाही दिली.
 
उपसरपंच मिलिंद पाटील, किशोर पाटील, विलास पाटील, बंडू गुरव यांनी आयोजित केलेल्या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुधीरदादा यांचे गावामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुधीरदादा गाडगीळ यांच्याबरोबर माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

घरोघरी महिला दादांना औक्षण करीत होत्या. दादांनी श्री मरगुबाई मंदिरात दर्शन घेतले.  एसटी स्टँडवरील समाज मंदिरात आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.  गावात प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत दादांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत होत होते.
 
प्रचारफेरीच्या मार्गावर दादांनी श्री दत्त मंदिर, दर्गा, मारुती मंदिर, पद्मावती मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात  दर्शन घेतले. उपसरपंच मिलिंद पाटील यांच्या घरी सुधीरदादांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी  मिलिंद पाटील म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात एवढा प्रचंड निधी आमच्या गावाला कधीच मिळाला नव्हता तो सुधीरदादा यांच्यामुळे मिळाला. आमच्या गावाचा कायापालट झाला.  सुधीरदादा यांना पदमाळे मधून आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य देणार. 
प्रचार फेरीत किशोर पाटील, जयसिंग ( बंडू )  गुरव, दिलीप भाऊ कदम, बाबुराव मोरे, संजय जगदाळे, भोलेनाथ कांबळे, विलास पाटील, प्रकाशअण्णा पाटील, संजय रंगराव जगदाळे, सुनील जगदाळे, संजय कोळी, महादेव बाबा पाटील, अनिल कोळी, रुपेश कोळी, सौरभ चव्हाण, सुधीर कोळी, रोहित मोरे,  तेजस्विनी पाटील, अश्विनी कोळी, वंदना मोरे, सुरेखा कोळी, मीना कोळी, उषा जगदाळे, साधना मोरे, यशोदा संकपाळ, आशा मोरे, स्नेहल मोरे, पूजा पवार, राजाक्का मोरे, आनंदी मोरे, मेघा कोळी, स्वप्नाली कोळी, मयुरी गुरव, निर्मला सूर्यवंशी, सुनीता चव्हाण, अनिता जगदाळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले  होते. 

फोटो कॅप्शन 
 
1) सांगली :आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची पदमाळे गावात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.
 
२) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची पदमाळे गावात प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.