Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कडेगावात भारती हॉस्पिटल उभारणार:, विश्वजीत कदम

कडेगावात भारती हॉस्पिटल उभारणार:, विश्वजीत कदम 


कडेगाव : पलूस व कडेगाव तालुक्यातील तसेच जवळच्या भागातील ग्रामस्थांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुणे व सांगली येथील भारती हॉस्पिटलच्या धर्तीवर कडेगाव येथेही सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक भारती हॉस्पिटल उभारणार असल्याची घोषणा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली.

कडेगाव शहरातील विविध प्रभागात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. कदम यांनी ही घोषणा केली.  यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, सोनहिराचे उपाध्यक्ष दीपक भोसले, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजय शिंदे, साजिद पाटील उपस्थित होते. कदम म्हणाले, जनतेच्या आशिर्वादाने मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी मिळाली. यापुढेही शहरात अधिकाधिक प्रकल्प व विकास योजना राबवण्याचा मानस आहे. यावेळी सागर सूर्यवंशी, सागर सकटे, मनोजकुमार मिसाळ, महेश जाधव, सिद्दिक पठाण, दादासो माळी, प्रदीप देसाई, सागर सुर्यवशी, मोहन गायकवाड, शशिकांत रासकर, वैभव देसाई, रघुनाथ गायकवाड, दिनकर जाधव, आकाश धर्मे उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.