Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना

क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना

ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूजला सामना खेळत असताना दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. शेफिल्ड शील्ड सामन्यादरम्यान डोक्याला बाऊन्सर लागल्याने फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता, यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या घटनेला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता महाराष्ट्रात एक मोठी घडना घडली आहे. मैदानावरच एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे.

 

महाराष्ट्रातील संभाजी नगर जिल्ह्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान एका ३५ वर्षीय क्रिकेटपटूला आपला जीव गमवावा लागला. २८ नोव्हेंबर रोजी गरवारे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सामन्यात ही घटना घडली. मैदानात क्रिकेट सामना खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने इम्रान पटेल या क्रिकेटपटूचे निधन झाले. गरवारे येथे लकी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता.

इम्रान लकी या सामन्यातील संघाचा कर्णधार होता आणि सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला होता. फलंदाजी करताना त्याने दोन चांगलेच चौकार लगावले होते. पण खेळपट्टीवर काही वेळ घालवल्यानंतर त्याच्या छातीत आणि हातामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्याने पंचांना माहिती दिली. यानंतर पंचांनी त्याला मैदान सोडण्याची परवानगी दिली.


पंचांच्या परवानगीनंतर इम्रान नुकताच पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता आणि अचानक तो मैदानात बेशुद्ध पडला. लोकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला रुग्णालयात नेले. इम्रानला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली, कारण सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/DeeEternalOpt/status/1862194697017368626

इम्रानच्या कुटुंबासाठी हा मोठा अपघात आहे. त्याच्या पश्चात आई व तीन मुली असा परिवार आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी इम्रानच्या तिसऱ्या मुलीचा जन्म झाला. इम्रान पटेलचा सहकारी नसीर खानने सांगितले की, सामन्यापूर्वी त्याला असा काही त्रास बिलकुल जाणवला नव्हता. तो म्हणाला, ‘इमरानला कोणताही इतर आजार किंवा काही त्रास नव्हता. तो फिट होता. तो एक अष्टपैलू खेळाडू होता ज्याला क्रिकेटची खूप आवड होती. आम्ही सर्व अजूनही शॉकमध्ये आहोत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.