Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीर दादा महायुतीस मातंग समाजाचा पाठिंबा जाहीरअभिमन्यू भोसले ; सांगलीमध्ये बैठक

सुधीर दादा महायुतीस मातंग समाजाचा पाठिंबा जाहीर अभिमन्यू भोसले ; सांगलीमध्ये बैठक
 
 
सांगली, दि. ११: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार यांना मातंग समाज पाठिंबा देत आहे, अशी माहिती समाजातर्फे अभिमन्यू भोसले यांनी एका निवेदनाद्वारे दिली. पाठिंब्याचे हे निवेदन त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ ह्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांना दिले.

सांगली येथे जिल्ह्यातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुधीर दादा गाडगीळ तसेच महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भोसले यांनी दिली.

भोसले म्हणाले, महायुती सरकार आणि महायुती यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये मातंग समाजासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची भरघोस मदत दिली. लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील स्मारकासाठी मदत दिली. बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करून मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला. 

ते म्हणाले, विधानपरिषदेवर मातंग समाजाच्या अमित गोरखे निवड महायुतीने केली. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत  जेजुरी येथील श्री खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षपदी  मातंग समाजाचे अनिल सौंदडे यांची निवड झाली.सांगली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक  प्रशिक्षण केंद्र असे नाव देऊन मातंग समाजाचा गौरव केला.
 
महायुतीने केलेल्या  या सर्व कामाची दखल घेऊन सांगलीतून सुधीरदादा गाडगीळ तसेच जिल्ह्यातून महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन  समाजातर्फे करण्यात आले आहे. या बैठकीसाठी  जिल्ह्यातून मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते. बैठकीचे नियोजन  अभिमन्यू भोसले (नाना) यांनी केले होते. या बैठकीस श्री दादा महाराज, माजी नगरसेविका श्रीमती अप्सरा वायदंडे, स्नेहा जगताप, ऍडव्होकेट अमोल बोळाज, अभिजीत तिवडे, प्रकाश आवळे, पप्पू वायदंडे, चंद्रकांत आवळे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगली: सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना मातंग समाजातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसे निवेदनही  सिद्धार्थ गाडगीळ यांना देण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.