Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या विस्तारीत भागाच्या नरक यातना संपवणार..पृथ्वीराज पाटील

सांगलीच्या विस्तारीत भागाच्या नरक यातना संपवणार.. पृथ्वीराज पाटील
 

सांगली दि.५: बशीच्या आकाराची सांगली.. पावसाळ्यात पाणी निचरा व्यवस्था नाही.. विस्तारीत भागातील शामरावनगरात तर दलदलीचे.. घाणीचे साम्राज्य.. गटारी बहुतेक ठिकाणी तुंबलेल्या तर काही भागात गटारी नाहीत.. मोकळ्या प्लाॅटवर झाडी झुडपांचे जंगलच.. साप, घुशी आणि उंदरांचा  वावर.. नाईलाजास्तव जीव मुठीत धरून जगणे वाट्याला आलेल्या शामरावनगर भागातील नागरिक आपल्या या नरक यातना कधी संपणार याची प्रतिक्षा करत आहेत. .. दहा वर्षात आमदारांनी कांहीच केलं नाही. आता पृथ्वीराजबाबा तुम्हीच आमची या नरक यातनेतून सुटका करू शकता अशी आर्त हाक शामरावनगरातील नागरिकांनी पृथ्वीराज पाटील यांना दिली.

येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे महाआघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. मतदार गृहभेटीत आज त्यांनी शंभरफुटी व दक्षिणेकडील शामरावनगर भागात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी या विस्तारीत भागाची दयनीय अवस्था सांगितली.
 
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकार असताना रु. १०कोटी निधी आणला. या विस्तारीत भागात रस्ते केले.. कांही गटारी केल्या परंतु दुर्दैवाने गेल्या दहा वर्षांत या विस्तारीत भागाकडे विद्यमान आमदारांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अनेक गटारी तुंबलेल्या व अर्धवट आहेत. बशीसारखी जमीन असल्याने पाण्याचा निचरा होत नाही..डासांची पैदास, घाणीचे साम्राज्य यामुळेच आजारपण पाचवीला पुजलेले. सत्ता असताना आ. गाडगीळ यांनी या भागासाठी काहीही केले नाही. आता त्यांना घरी बसवण्यासाठी वीस तारखेला हात चिन्हासमोरील बटण दाबून मला विधानसभेत पाठवा. या विस्तारीत भागातील नागरिकांची नरक यातनेतून सुटका केल्याशिवाय राहणार नाही. अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार आहे. लोकांनी काम न करणाऱ्या आमदारांना घरी बसवायचं ठरवलं आहे. अपक्षांना मत म्हणजे निष्क्रीय भाजपा आमदाराला मत दिल्यासारखे आहे.गेल्यावेळी हुकलेली संधी पुन्हा द्या... विस्तारीत भाग समस्यामुक्त करण्यासाठी मी आराखडा तयार केला आहे.'
यावेळी माजी नगरसेवक रज्जाक नाईक, अभिजित भोसले, ताजुद्दीन शेख, प्रा. एन.डी.बिरनाळे, नितीन तावदारे, प्रदीप पाटील, अरुण पळसुले, चंद्रकांत माळी, जोहेब पन्हाळकर, असिफ व जमादार, चाँदभाई मुजावर, मन्सूर नाईक, शाहरुख सनदी, नईम हजारे, कैस शेख, आतिब जित्तीकर, अहमद मुजावर, अख्तर बाणदार, सत्तारभाई सनदी, शाहीद व अहमद मुजावर  गुलाबराव खराडे, अरविंद खराडे, गौतम सोनार, गौतम कांबळे, अमोल पाटील, कविता धनवाणी, शैलजा कांबळे व शामरावनगर भागातील नागरीक उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.