Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवारांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

अजित पवारांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
 

मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (जित पवार) पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून तळेगाव दाभाडे पोलिसांनी ३७ लाख रुपयांची रोकडे जप्त केल्याचा प्रकार ताजा अस्तानाच देहूरोड पोलिसांनी देहुगावात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून सव्वातीन लाखाची रोकड जप्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष विवेक वसंत काळोखे (वय ४४, रा. काळोखे मळा, देहूगाव) यांच्यासह सागर निवृत्ती भसे (वय ३९, रा. भीमाशंकर सोसायटी, देहूगाव) र्याच्याकडून रोकड जप्त केली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुगावातील चव्हाणनगर येथे दोन जण मोटारीत पैसे घेऊन मतदारांना वाटण्यासाठी आले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोटारीत भसे आणि काळोखे हे दोघे जण होते. पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता चालकाच्या आसनाच्या बाजूच्या आसनाखालील एका पिशवीमध्ये तीन लाख २० हजार रूपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत काळोखे व बसे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. ही रक्कम कोठून आणली याबाबत काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रोकड दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. पुढील कारवाईकरिता ही रोकड निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.