Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवी धामणी गाव विकासात आघाडीवर ठेवूसुधीरदादा गाडगीळ; गावात उत्साहात प्रचारफेरी

नवी धामणी गाव विकासात आघाडीवर ठेवू सुधीरदादा गाडगीळ; गावात उत्साहात प्रचारफेरी
 
 
सांगली, दि. १६: गेल्या दहा वर्षात नव्या इनाम धामणी गावात ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे भरपूर निधी देऊन अनेक विकास कामे आपण पूर्ण केली आहेत. पुढील पाच वर्षात या गावातील उर्वरित सर्व कामे पूर्ण करून  विकासाच्या बाबतीत हे गाव आघाडीवर ठेवू, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
 
आमदार गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आज गावात प्रचारफेरी काढण्यात आली. ग्रामस्थांनी  घरासमोर रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतषबाजी करीत आणि घोषणांच्या निनादात दादांचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी  त्यांना ओवाळून  औक्षण केले. 

अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात या गावाकडे कोणी एवढे लक्ष दिले नव्हते. सुधीरदादा गाडगीळ आमदार झाल्यानंतर त्यांनी या गावासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला. ते आमदार झाल्यामुळेच या गावाचे भाग्य उजळले, रूप बदलले.  गावामध्ये पाण्याची टाकी उभी राहिली. विस्तारित स्वरूपात आरोग्य केंद्र उभे राहिले. रस्ते, गटारी अशी कामे झाली. आता गावामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम होणार आहे.गावातील  समाज मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्यामुळे  सुधीरदादांनाच पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्य या गावातून द्यायचे असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
वाजंत्री लावून,घोषणांच्या निनादात प्रचारफेरीला सुरुवात झाली.दारोदारी  तसेच प्रचारफेरीच्या मार्गावरही  रांगोळ्या काढल्या होत्या.  दादांच्यावर पुष्पवृष्टी करीत महिला औक्षण करीत होत्या. भाजपच्या जैन प्रकोष्ठचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक मलमे , बूथ प्रमुख सचिन वडर, विशाल पाटील, प्रशांत हेरले, गणेश मलमे, वैभव मलमे, उमाजी मलमे, सुरेश चिंचवाडे, सतीश पाटील, विनायक शेटे, निलेश कोळी, धनु वठारे, तन्मय पाटील, रवी वडर, तुषार कोळी, सिद्धार्थ पाटील, सचिन पाटील, दिगंबर कोळी, भरत जाधव, सचिन आवटी तसेच गावातील महिला व पुरुष व जेष्ठ मंडळी प्रचंड संख्येने सहभागी झाली होती. 

फोटो 
 
1) सांगली.: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे प्रचार फेरीसाठी नव्या इनाम धामणी गावात आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 
 
2) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी नवी इनामधामणी गावात प्रचार फेरी काढण्यात आली. 
 
3) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची नव्या इनामधामणीत प्रचार फेरी निघाली. त्यावेळी महिलांनी सुधीरदादांचे औक्षण करून स्वागत केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.