सांगली दि.८: आज महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी प्रभाग क्र.१ मधील वसंतनगरातील श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन या भागातील गृहभेटीतून प्रचार प्रारंभ केला. त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या.. सांगलीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका मांडली.
माजी नगरसेवक विजय घाडगे म्हणाले, 'पृथ्वीराज पाटीलच निवडून येणार. त्यानी गेल्या पाच वर्षांत सांगलीसाठी खूप काम केले आहे. शिवाय ही निवडणूक जनतेनीच हाती घेतली आहे.वसंतनगर, यशवंतनगर या भागात त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी वसंतनगर भाग मतांची आघाडी देण्यात सगळ्यात पुढे असेल. हा भाग काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. वसंतनगरात पृथ्वीराज यांनी प्रत्येक घराला भेट दिली आहे. त्यांनी महापूर व कोरोना काळात अनेक लोकोपयोगी कामे पूर्ण केली आहेत. त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार केल्याचे माजी नगरसेवक किरण सुर्यवंशी,सुनिल व शशिकांत शिंदे, गौस नदाफ, अनिल मोहिते, रमेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, वसंतनगर हा भाग कायमच काँग्रेसच्या पाठिशी आहे. या भागात काबाडकष्ट करुन उदरनिर्वाह करणारे नागरिक आहेत. या भागातील रस्ते,भुयारी गटारीचे अपूर्ण कामे, खुले भूखंड विकसीत करणे, शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छता इ. कामे पूर्ण करण्यासाठी मी कटीबध्द आहे. मला गेल्या वेळी नगण्य मतांनी विजयाने हुलकावणी दिली. यावेळी ती हुकलेली संधी मिळाली तर आमदार म्हणून वसंतनगर आणि सांगलीचा चेहरामोहरा बदलून आपला विश्वास सार्थ ठरवेन. हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे.यावेळी किरण सुर्यवंशी, विजय घाडगे,मुस्ताक रंगरेज, गौस नदाफ, रोहन खुटाळे, शशिकांत शिंदे, सुनील शिंदे,फाळके गुरुजी, संदीप पाटील, शशिकांत जाधव, राजगोंडा पाटील, तुकाराम सावंत, सदाशिव गुरव, युवराज माने, बाबासाहेब भोसले वकील, संभाजी चव्हाण, अमोल सुर्यवंशी, सत्यजित व नूतन पवार, सागर खंदारे, कांचन तुपे, कविता व पृथ्वीराज बोंद्रे, बबलुशा शर्मा, छाया जाधव, जयश्री घोरपडे, संजय सुर्यवंशी, गौरी तांदळे, अमित पाटील, विशाल सुर्यवंशी, संजय पाटील, प्रशांत खांडेकर, सुभाष तुपे, निखिलेश पाटोळे, योगेश पाटील खोतवाडी, अमित पाटील व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.