Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पायाखालची वाळू घसरल्यामुळेचपृथ्वीराज पाटील यांच्याकडून बँकेविषयी षडयंत्र :-जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचा आरोप

पायाखालची वाळू घसरल्यामुळेच पृथ्वीराज पाटील यांच्याकडून बँकेविषयी षडयंत्र - जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचा आरोप
 

सांगली : काँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट घेऊन सुद्धा पृथ्वीराज पाटील यांना समोर मोठा पराभव दिसू लागला आहे त्यामुळेच अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी जवळपास कुठलाच मुद्दा नसल्यामुळे वसंतदादा  सहकारी बँकेचा विषय पुढे आणला आहे परंतु नागरिकांना हे सगळे माहिती आहे आणि त्याचे खुलासे आम्ही वेळोवेळी केलेले आहेत काहीही झाले तरी या निवडणुकीत मीच निवडून येणार आहे असा दावा अपक्ष उमेदवार जयश्रीताई (वहिनी) मदनभाऊ पाटील यांनी केला आहे.

जयश्रीवहिनी म्हणाल्या,
 
निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच सभेत पृथ्वीराज पाटील म्हणाले होते की जयश्री वहिनी माझ्या सोबत असल्याशिवाय मी आमदार होऊ शकत नाही आम्ही तरी आता त्यांच्याबरोबर नाही स्वतंत्रपणाने लढत आहोत आणि आम्ही आम्हाला विजय दृष्टीपथात आलेला आहे आणि त्यांना त्यांचा पराभव स्वच्छ दिसू लागलेला आहे त्यामुळेच त्यांनी आता आमच्यावर काहीही आरोप करायला सुरुवात केली आहे.

जयश्रीवहिनी म्हणाल्या, वसंतदादा सहकारी बँकेच्यासंदर्भात याआधी मदनभाऊ पाटील यांना बदनाम केले गेले आणि आता हीच मंडळी मला बदनाम करत आहेत. बँक अडचणीत आणली असा जाणीवपूर्वक प्रचार  ते करत आहेत, परंतु मदनभाऊंनी बँकेबाबत घेतलेले निर्णयामागे तरुण उद्योजक मोठे व्हावेत, सांगलीचा व्यापार - उद्योग वाढावा असा प्रामाणिक हेतू होता, पण यातील काही मंडळी खरोखरीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली तर काहींनी कृत्रिम अडचणींच्या माध्यमातून बँक अडचणीत आणली. यामध्येसुद्धा चूक नेमकी कोणाची ? विश्वास  टाकणाऱ्यांची की विश्वासघात करणाऱ्यांची? मला वाटते, सभासद सुज्ञ आहेत. त्यांना सगळं माहिती आहे.
त्या म्हणाल्या, जेव्हा बँकेवर अवसायक आणले तेव्हा 650 कोटींच्या ठेवी देणे होत्या. आज त्यापैकी फक्त 135 कोटी द्यावयाच्या राहिल्या आहेत आणि कर्जदारांकडून व्याजासह 350 कोटी येणे आहे तसेच बँकेची स्थावर मालमत्ता 25 कोटींपेक्षा जास्त आहे. मग घोटाळा कोठे झाला जर घोटाळा झाला असता तर 515 कोटींच्या ठेवी परत दिल्या गेल्या असत्या का ?

शेतकरी बँकेचा विषय निवडणुकीच्या वेळीच का निघतो..
 
इतर वेळी शेतकरी बँकेच्या विषय व त्या ठेवीदारांचा विषय व त्यांच्या विषयीचा कळवळा का नसतो  कारण इतर वेळी ते विषय घेऊन  त्याचा राजकीय फायदा होणार नाही हे माहित आहे म्हणून शिळ्या  काडीला ऊत आणल्या गत जाणीवपूर्वक वारंवार  विषय काढत आहेत.
शेतकरी बँकेत गैर व्यवहार झालेला नसून अनियमितता  झालेली आहे. काही कर्जदार हे जाणीवपूर्वक आजच्या घडीपर्यंत कर्ज भरत नाहीत ते सध्या कोणत्या पक्षात आहेत. कोणाचा प्रचार करत आहेत. याच्यावर शेतकरी बँकेच्या बाबतीत आरोप करणारे का बोलत नाहीत ? का त्यांची दातखिळी बसत आहे? 

जयश्रीवहिनी म्हणाल्या, शेतकरी बँकेत अडचणी आल्यानंतर सुरुवातीला प्रशासक नेमला जातो कामकाज सुधारण्याचा प्रयत्न केला जातो व त्यानंतर आवसायक नेमला जातो, मात्र शेतकरी बँकेच्या बाबतीत डायरेक्ट आवसायक नेमून बँक बंद पाडायची व सर्व ठेवीदारांना उध्वस्त करायचे षडयंत्र रचले गेले आणि सदर बँक बंद पाडली गेली  असो त्यात काही संचालक मंडळाच्या चुका असतीलही त्यांना कोणीही पाठीशी घालणार नाही.
 
मात्र भाऊ गेल्यानंतर एक स्त्री या सर्व कारवायांना सामोरे जात आपला संसार व आपल्या संस्था सांभाळत झालेला चुका निस्तारत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या आग्रहाकरिता राजकारणात काम करत असताना, कोणताही डाग नसल्यामुळे त्यांना जुन्या संस्थांच्या राजकारणातून बदनाम करण्याचा रडीचा डाव खेळणारे किती संस्करी असतील हे मात्र आता कळून चुकले आहे.
 
एक स्त्री आपल्या कार्यकर्त्यांच्याबरोबर सांगली विधानसभेची निवडणूक लढवत असताना तिला कोणत्याच माध्यमातून थांबवता येत नाही, आरोप करता येत नाही, तिचा झंझावात पाहून तिला मिळणारी लोकप्रियता तिच्यावर मतदारांचे असलेले प्रेम बघून असले कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न चालू आहे हे सर्वसामान्य सांगलीकर चांगले ओळखून आहेत. येणारे वीस तारखेला ह्या असल्या तुमच्यासारख्या षडयंत्री घाणेरड्या कोळशाच्या प्रवृत्तींमधून मतदार 'हिरा' हुडकून निवडून देणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
त्या म्हणाल्या, कालपर्यंत मला विधानपरिषदेचे शब्द देणारे, आमदार करणारे अचानक न केल्या घोटाळ्याबद्दल कसे काय बोलतात? याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मला मात्र त्यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीबद्दल व आर्थिक पिळवणूकीबद्दल मी बोलणार नाही. मतदारच त्यांची जागा दाखवतील.

आम्हाला ईडीची भीती नाही 
आम्हाला ईडीची भीती असते तर आम्ही केव्हाच काँग्रेसचा विचार सोडून वेगळीच वाट निवडली असती. मागील विधानसभेच्या वेळी जो दिलेला शब्द तुम्ही तो फिरवला नसता तर आज आम्हाला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावीच लागली नसती

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.