Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील यांना सर्व श्रमिक संघटनेचा जाहीर पाठिंबा..

पृथ्वीराज पाटील यांना सर्व श्रमिक संघटनेचा जाहीर पाठिंबा..
 

श्रमिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन दरबारी आवाज उठवणार.. पृथ्वीराज पाटील

सांगली दि.४: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांचेकडून श्रमिक पेन्शनर्स यांना रु.१०००पेन्शन मंजूर करण्यात आले. आता ते किमान रु. ९००० करुन अन्य ७प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत शासन दरबारी आवाज उठवणार. श्रमिकांच्या घामाचा पैसा शेअर्स मध्ये गुंतवणे चुकीचे आहे. मोदी सरकारने श्रमिकावर अन्याय केला आहे. भाजपा सरकार उद्योगपतींच्या प्रभावाखाली आहे. केंद्र व राज्य सरकार असंवेदनशील आहेत. पक्ष फोडून फूट पाडणे आणि राज्य करणे एवढेच काम करणाऱ्या महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करा. 
 
मला आमदार म्हणून सेवेची संधी मिळाली तर आपल्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करवून घेण्यासाठी विधीमंडळात तसा ठराव करुन केंद्र शासनाला पाठवणार असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगलीत अयोध्या अपार्टमेन्टमधील सर्व श्रमिक संघटनेच्या कार्यालयात पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देणार असे श्रमिक पेन्शनर्स यांनी जाहीर करुन तसे जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी पृथ्वीराज यांचा सत्कार करण्यात आला.प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन केले. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविकात, "पृथ्वीराजबाबा पाटील यांनी गोरगरीब श्रमिकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. ते संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत. त्यानाच निवडून देणार असा श्रमिकांनी निश्चिय केल्याचे गोपाळ पाटील यांनी सांगितले. 

यावेळी गोपाळ पाटील, तुकाराम पाटील,महादेव देशिंगे, दिपक कांबळे, तोडकर, निवास पाटील, सगरे, अशोक खोत, एस. टी. बनसोडे, प्रकाश पाटील, चिकोडी, मठपती, मुरसल, भगवान शिंदे, घोरपडे, विनायक थोरात, अशोक कदम, यमगेकर, भाऊसाहेब यादव, विजय कांबळे, पी. एच. माने, जी. टी. कदम, शरद कुलकर्णी, सदाशिव खोपडे, बजरंग साळोखे , सुभाष पाटील, ए. डी. पाटील प्रा. एन.डी.बिरनाळे, नितीन तावदारे, आयुब निशाणदार व श्रमिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.