उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने चुकीच्या स्पर्शापासून आणि पुरुषांच्या वाईट हेतूपासून वाचवण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार पुरुषांनी (टेलर) महिलांचे कपडे शिवू नयेत, तसंच त्यांचे केसही कापू नयेत. जीममध्ये महिला ट्रेनरही असायला हवी.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता चौहान यांनी हा प्रस्वात सादर केला
आहे, ज्याला इतर सदस्यांना समर्थन दिलं आहे.
28 ऑक्टोबरला महिला आयोगाच्या बैठकीनंतर असे सल्ले देण्यात आले. यामध्ये पुरुषांना महिलांचं माप घेण्याची परवानगी न देणं, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावणं यांचा सहभाग आहे. सध्या हा फक्त एक प्रस्ताव आहे आणि महिला आयोगानंतर राज्य सरकार यासंदर्भात कायदा बनवण्यासाठी आग्रह करणार आहे. महिला आयोगाने आखून दिलेल्या नियमांचं पालन होईल याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असेल.
महिला आयोगाच्या सदस्या हिमानी अग्रवाल यांनी शुक्रवारी यासंदर्भात सांगितलं की, "नुकत्याच झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवण्यात आला की फक्त महिला टेलरच महिलांच्या कपड्याचं माप घेतील. तसंच शॉपमध्ये सीसीटीव्ही लावू नयेत".
आम्ही हेदेखील सांगितलं की, सलूनमध्ये फक्त महिला कर्मचारीच महिला ग्राहकांना हाताळतील. कारण अशा ठिकाणी पुरुषांकडून महिलांची छेड काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते (पुरुष) चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. काही पुरुषांचा हेतू चांगला नसतो असंही त्या म्हणाल्या आहेत. सर्वच पुरुषांचे हेतू वाईट नसतात असंही त्यांनी स्पष्ट केलं.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता चौहान यांनी सांगितलं की, ज्या जीममध्ये महिला जातात तिथे महिला ट्रेनर असायलहा हव्यात. सर्व जीम ट्रेनरची पोलिसांकडून पडताळणी व्हायला हवी. जर एखाद्या महिलेला पुरुष ट्रेनरकडून ट्रेनिंग घ्यायची असेल तर तिला लिखित द्यावं लागेल. कारण महिला आयोगाला वारंवार जीममध्ये महिला, तरुणींचं शोषण केल्याच्या तक्रारी मिळत असतात, यानंतरच हा निर्णय घेतला आहे. तसंच महिला जिथे कपडे शिवण्यासाठी जातात तिथे महिला टेलर असतील याची खात्री करायला हवी. तसंच ज्या स्कूल बसमधून मुली जातात त्यातही महिला कर्मचारी असायला हव्यात. महिला आयोग यासंदर्भात जिल्ह्यांना आदेश देणार आहे. नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.