Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील यांची निवडणूक सांगलीकर जनतेने हाती घेतली..गृहभेटी आणि बैठकांमधून पृथ्वीराज यांचा झंजावाती प्रचार

पृथ्वीराज पाटील यांची निवडणूक सांगलीकर जनतेने हाती घेतली.. गृहभेटी आणि बैठकांमधून पृथ्वीराज यांचा झंजावाती प्रचार
 

सांगली दि.१०: गेली दहा वर्षे सांगलीत काँग्रेस पक्षाचे अस्तित्व आणि अस्मिता जपलेले शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आणि त्याचवेळी पक्षाने जनसेवा करणाऱ्या सामान्य माणसाला न्याय दिल्याने सांगलीकरांनी समाधान व्यक्त केले. 

उमेदवारी मिळण्यापूर्वी गेली पाच वर्षे अथकपणे त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. या निवडणुकीत त्यांनी गृहभेटी आणि गृहबैठकांचा धडाकाच लावला आहे. ना पुढे मागे गाड्यांचा ताफा, ना थाटमाट, अत्यंत साधेपणाने मतदारांच्या दारात, घरात गाठीभेटी घेऊन भरघोस मतांनी  त्यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांना प्रभाग क्र.१ मधील सह्याद्रीनगर, संजयनगर आणि वसंतनगर या भागातील मतदारांकडून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पृथ्वीराजबाबा म्हणजे कामाचा आणि हक्काचा माणूस, पृथ्वीराजबाबा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. जेष्ठ नागरिक, महिला, युवा वर्ग, शेतकरी व कष्टकरी कामगार वर्गातील सर्वच घटकांतील मतदार पृथ्वीराज पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे ठरवले आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातील जनताच ही निवडणूक हाती घेऊन पृथ्वीराज यांना आमदार करणारच अशी भीष्मप्रतिज्ञा केल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहा वर्षे संधी देऊनही विद्यमान आमदार प्रभाग क्र. १ मध्ये कधीच फिरकले नाहीत! गढूळ, अशुद्ध पाणी व अपुरा पाणी पुरवठा , खड्डेमय खराब रस्ते, डासांचा प्रादुर्भाव,बेरोजगारी,महागाई महिलावर अत्याचार या गंभीर समस्या सोडवण्यासाठी विद्यमान आमदारांनी कांहीच केले नाही.सांगलीकर वैतागून गेले आहेत. त्यांना आता या भागातील मतदार घरी बसवणार आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांना पाच वर्षासाठी संधी देणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असल्याचे मत मराठा समाजाचे उपाध्यक्ष ए. डी. पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
आजघडीला पृथ्वीराज यांच्या प्रचाराचा झंजावात पाहिला तर त्यांनी प्रचारात व जनसंपर्कात सर्वात पुढे असल्याचे दिसून येते, अशी चर्चा प्रभाग क्र.१ मध्ये ऐकायला मिळते. पृथ्वीराजबाबा पाटील यांचे पारडे जड करण्यात विद्यमान आमदाराला कंटाळलेल्या जनतेनेच पुढाकार घेतल्याचे पुरोगामी विचारवंत व मराठा समाजाचे अध्यक्ष ए. डी. पाटील म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.