Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट, १० जण जागच्या जागीच...जळगावमध्ये काय घडलं?

वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट, १० जण जागच्या जागीच...जळगावमध्ये काय घडलं?
 

जळगाव : जळगाव जिल्हयातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत ओमनी या चारचाकी गाडीत अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. इच्छादेवी पोलिस चौकीजवळ ही संपूर्ण घटना घडली आहे. या घटनेत १0 जण भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, तर तिघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सूरू आहेत. या घटनेने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे येथे राहणारे संजय गणेश वासवाला (वय ४५) हे पत्नी प्रतिभा व मुलगी रश्मी यांच्यासह जळगावातील साडू भरत दालवाला यांच्याकडे मंगळवारी सकाळी आले होते. संजय वासवाला यांचे भरत दालवाला यांच्या कुटुंबासह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात धार्मिक विधी करण्याचे नियोजन होते. यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांची ओमनी व्हॅन भाडेतत्वावर प्रवासासाठी ठरवली होती.

ठरल्यानुसार अमळनेर येथे जायला निघाल्यावर कारचालकाने दुपारी ४ वाजेच्या सुमारास ईच्छादेवी पोलिस चौकीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या अवैध गैस रिफिलिंग सेंटरवर त्याने गॅस भरण्यासाठी कार थांबवली होती. तिथे टाकीमध्ये गॅस भरताना टाकी फूटून मोठा स्फोट झाल्याची घटना घडली होती.या स्फोटामुळे ओमनीने देखील पेट घेतला होता. आणि नजीकच्या दुकानांना देखील आग लागली होती.

या स्फोटात तीन महिलांसह दहा जण भाजल्याची घटना घडली होती. यामध्ये व्हॅनचालकासह गॅस भरणारा आणि शेजारचा व्यावसायिक है देखील जखमी झाला होता. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या पथकाने दोन बंब वापरून आग आटोक्यात आणली होती. या भीषण स्फोटात १० जण भाजले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यापैकी तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.