मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्मोनल ट्रान्सफर्मेशन जर्नीचा व्हिडीओ आर्यनने शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आलाय.
पण त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. आर्यनने मुलगा ते मुलगी असं ट्रान्सफर्मेशन कसं झालं हे सांगितलं होतं. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट, धोनी आणि संजय बांगर यांच्यासोबतचे फोटो आहेत. आर्यनने सर्जरी केल्यानंतर १० महिन्यांनी अनया बनला आहे.
मुलगी बनल्यानंतर आपण आनंदी असल्याचं त्यानं सांगितलंय. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आर्यनने म्हटलं होतं की, क्रिकेट खेळण्याचं स्वप्न साकारण्यासाठी मी अनेक गोष्टींचा त्याग केला. पण याशिवाय आणखी एक प्रवास आहे. जो माझ्या स्वत:च्या शोधाचा आहे. माझा प्रवास सोपा नव्हता पण यात मला विजय मिळाला जो इतर गोष्टींपेक्षा मोठा आहे. आर्यन बांगरसुद्धा क्रिकेटर असून तो फलंदाज आहे. तो लोकल क्रिकेट क्लब इस्लाम जिमखानासाठी खेळतो. त्याशिवाय लिसेस्टरशरमध्ये हिंकले क्रिकेट क्लबकडूनही तो खेळला आहे.
आर्यनचा अनया बनल्यानंतर तो सध्या इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये राहत आहे. तिथं एका काउंटी क्लबकडून क्रिकेट खेळतो. मात्र तो कोणत्या क्रिकेट क्लबकडून खेळतो हे स्पष्ट नाही. इन्स्टाग्रामवर त्याने शेअर केलेल्या रिल्समध्ये असं दिसतं की, त्यानं एका सामन्यात १४५ धावा केल्या होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.