Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयश्री मदन पाटील यांना अनेक संस्था , संघटनेचा पाठींबा परिवर्तन घडणार विधानभवनात "हिरा" चमकणार : बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती

जयश्री मदन पाटील यांना  अनेक संस्था , संघटनेचा पाठींबा परिवर्तन घडणार विधानभवनात  "हिरा" चमकणार : बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती 


सांगली विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील  यांना अनेक संस्था , संघटना पाठींबा देत आहेत.  वसंतदादा घराण्याने केलेल्या आज पर्यंतच्या कामाचा लोकाजोखा बघता अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.  सांगली विधान मतदार संघात बदल घडणार आणि हिरा चमकणार असे बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीने सांगितले.

आज बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचा एक लढावु  संघटनेने अपक्ष उमेदवार जयश्री पाटील जाहीर पाठिंब्याचे पत्र वसंतदादा भवन येथे माजी महापौर किशोर शहा , पी एल रजपूत , सुहास पाटील,  वाय डी पाटील यांच्याकडे सुपूर्द करुन संघटनेने रस्त्यावर उतरुन प्रचारास सुरु केला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाजीराव नाईक , राज्य कार्याध्यक्ष सावळा खुडे,  शहर अध्यक्षा विद्या गोरख बनसोडे,  जिल्हा उपाध्यक्षा सुनिता ज्ञानप्रकाश कुलदश्रेष्ठ,  राधिका कुलश्रेष्ठ,  जत तालुका अध्यक्ष शिवाजी महाणूर  , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब शिंदे,  सांगली जिल्हा युवा अध्यक्ष अंकुश खुडे,  जत तालुका अध्यक्षा रेखा कांबळे,  मिरज तालुका शहर अध्यक्षा मंगल बनसोडे,    सांगली जिल्हा कार्याध्यक्ष   प्रकाश होळकर  यांच्या पदाधिकारी उपस्थित होते .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.