सांगली, दि.९ : दक्षिण भारत जैन सभेच्या मुख्यालयास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सदिच्छा भेट दिली. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने अध्यक्ष भालचंद्र पाटील आणि चेअरमन रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सावंत आणि आमदार गाडगीळ यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. भालचंद्र पाटील यांनी स्वागत केले.रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले.
सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, जैन समाजासाठी आपण केल्या दहा वर्षात कामे केली आहेत. जी काही कामे अपूर्ण राहिली आहेत ती पूर्ण केली जातील. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सुधीरदादांनी आमदार म्हणून या मतदारसंघात केलेली विकासकामे भरपूर आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या विविध योजनाही आहेत. आपल्याला सर्वांगीण विकासाचा लाभ हा तळागाळापर्यंत पोचवायचा आहे. मतदार संघाचा आणखी विकास करण्यासाठी सुधीरदादांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, महामंत्री शांतीनाथ नांदगावे, महिला महामंत्री कमल मिळचे, अनिता पाटील, चंद्रकांत चौगुले, शितल शेडबाळे तसेच दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी व भाजपा नेते आमदार अभय पाटील,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिपकबाबा शिंदे, गौतम पवार आदी सदस्य उपस्थित होते.
1) सांगली: दक्षिण भारत जैन सभेतर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे स्वागत करण्यात आले.2) सांगली : दक्षिण भारत जैन सभेस गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासमवेत दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी.3) सांगली : दक्षिण भारत जैन सभेला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत.४) सांगली: दक्षिण भारत जैन सभेला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.