पृथ्वीराज पाटील हेच काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार.. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा :- आमदार विश्वजीत कदम
सांगली दि.८: काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील हेच आहेत. सांगली जिल्ह्य़ातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजेत. स्व गुलाबराव पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. ते स्व. इंदिराजी गांधी यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी काँग्रेस व सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज पाटील नेटाने पुढे चालवत आहेत. समाजकारणातून राजकारण करत त्यांनी पक्ष व सांगलीसाठी चांगले काम केले आहे. काँग्रेस सत्तेत नसताना, मोदी लाटेत त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन पक्ष वाढविला आहे. त्यांना निवडून देऊन काँग्रेसचा, महाआघाडीचा आमदार झाला पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. ते आज मारुती चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या हस्ते मारुतीच्या मंदिरात नारळ वाढवून सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, 'माझी उमेदवारी माझे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या संमतीनंतरच फायनल झाली आहे. स्व. गुलाबराव पाटील आणि स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे घनिष्ठ संबंध होते. माझा जन्म आणि शिक्षण सांगलीत. मी लहानाचा मोठा सांगलीत झालो. अखेरपर्यंत सांगलीच्या मातीसाठी झिजत राहणार आहे. माझी लढाई भाजपाशी आहे. माझ्या रथाचे सारथी आमदार डॉ. विश्वजीत कदम आहेत. भाजपाने फूट पाडण्याचे षडयंत्र रचले परंतु त्यांचे षडयंत्र सांगलीकर मोडून काढणार. महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकजुटीने काम करत आहेत. दहा वर्षे मी सांगलीसाठी काम करत आहे. पुढची पाच वर्षे आमदार म्हणून संधी द्या. आमदार कसा असतो हे कामातून दाखवून देतो. संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत मी सांगलीकरांनी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी कटीबध्द आहे. भविष्यात सांगली कशी असावी याबाबत जनतेच्या सूचना घेऊन वैयक्तिक जाहीरनामा तयार केला आहे. १५ वर्षानंतर काँग्रेसला आमदार लाभणार आहे. हाताला मतदान करा. यावेळी संजय बजाज, प्रा. एन.डी.बिरनाळे, महावीर पाटील,उत्तम कांबळे, आशा पाटील, सचिन जगदाळे, शेरुभाई सौदागर,शंभूराज काटकर, हरीदास पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते निवडणुक गीताचे लाँचिंग झाले. मुन्ना कुरणे यांचा काँग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश होऊन घरवापसी झाली. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य व जयहिंद किसान सेनेचे गुंठेवारी चळवळीचे चंदनदादा चव्हाण यांनी पृथ्वीराज पाटील यांना जाहीर पाठिंब्याचे पत्रे दिली.
यावेळी काँग्रेसचे निरीक्षक आमदार बी. आर. पाटील,सुखदेवसिंग, संजय बजाज, शंभूराज काटकर,संगिता हारगे, उमेश देशमुख, दिनकर साळुंखे, शेरुभाई सौदागर, सचिन जगदाळे,बिपीन कदम, अशोकसिंग रजपूत,प्रा. एन.डी.बिरनाळे,नितीन मिरजकर, ज्योती आदाटे, विजया पृथ्वीराज पाटील, आशा पाटील, उत्तम कांबळे, डी. पी. बनसोडे, सिध्दार्थ माने, आयुब बारगीर, रज्जाक नाईक, कविता बोंद्रे, नूतन पवार, कांचन तुपे, डी. पी. बनसोडे,इलाई बारूदवाले
अजिज मेस्त्री, अभिजित भोसले, किरण सुर्यवंशी,
दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, सुहेल बलबंड
महावीर पाटील इनाम धामणी
कर्नाळ सरपंच संध्या कांबळे
सच्चिदानंद कदम व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व सदस्य आणि सांगलीकर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.