Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमरावती :-रागाच्या भरात रात्री घरातून बाहेर पडली, ज्यांच्याकडे लिफ्ट मागितली त्यांनी केला गँगरेप

अमरावती :-रागाच्या भरात रात्री घरातून बाहेर पडली, ज्यांच्याकडे लिफ्ट मागितली त्यांनी केला गँगरेप
 

अमरावती : घरात वाद झाल्यानंतर रागाच्या भरात निघून गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना अमरावतीत घडलीय. तरुणी घरातून बाहेर पडल्यानंतर तिला लिफ्टच्या बहाण्याने नेण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. अमरावतीत बुधवारी ही घटना उघडकीस आली असून गाडगे नगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५ वर्षांच्या तरुणीचा मंगळवारी रात्री आईसोबत वाद झाला. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास ती घरातून निघून गेली. शेगाव नाका इथं तिनं एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्यावर आधीच दोघेजण होते. त्यांनी तरुणीलासुद्धा दुचाकीवर घेतलं. तरुणाने दुचाकी एका बारवर थांबवून बिअर विकत घेतली. त्याचवेळी त्यांनी आणखी तीन सहकाऱ्यांना चारचाकी गाडी घेऊन येण्यास सांगितलं. त्या गाडीने तरुणीला सोबत घेऊन तरुण अज्ञात स्थळी गेले.

तरुणांनी गाडीत बसून दारू प्यायली आणि त्यानंतर गाडीतच तरुणीवर अत्याचार केले. अत्याचारानंतर पीडित तरुणीला अमरावतीतल्या बडनेरा परिसरात सोडून देत पोबारा केला. दरम्यान, तरुणीने घर गाठत घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. घरच्यांनी तरुणीला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. नांदगाव पेठ मार्गावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून एका आरोपीची ओळख पटवली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता इतर आरोपींची माहिती समोर आलीय. अटक केलेल्या आरोपींची नावे मनोज डोंगरे, अक्षय सरदार, अजय लोखंडे, मिलिंद डाहाट आणि प्रथम धाडसे अशी आहेत. या सर्वांचे वय २० ते ३० वर्षे इतकं असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.