कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून निवडणूक आयोगाची भरारी पथके सर्वत्र तैनात आहेत. पोलीसांकडूनही बेकायदा पार्टी, वाहतूक यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
कोल्हापूर पोलिसांनी एका बेकायदा पार्टीवर छापा टाकत ९ नृत्यांगनांसह ३१ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय. एका फार्महाऊसवर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. गगनबावडा परिसरातील कोदे येथे बेकायदा पार्टीवर छापा टाकला. पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने छापेमारी केलीय. ऐन दिवाळीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत अश्लील हावभाव करून नाचणाऱ्या 9 नृत्यांगनांसह 31 जणांना ताब्यात घेण्यात आलय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या 31 जणांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे सांगली सह कोल्हापुरातील इसमांचा समावेश आहे.गगनबावड्यातील कोदे परिसरात आंबेवाडी येथील नयनिल फार्म रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 4 लाख 51 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात दारू मोबाईल आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.