शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा
ओल्ड गोवा: गेल्या अनेक दिवसांपासून गोवेकर तसेच इतर भाविकांच्या मनात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे आणि गुरुवार (दि. २१ नोव्हेंबर) पासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हा आंतरराष्ट्रीय स्थरावरील महत्वाचा सोहळा असल्याने फक्त देशातूनच नाही तर विदेशातून देखील अनेक भाविक दरम्यान ओल्ड गोव्याला येणार आहेत.
पोर्तुगीजांच्या काळात ओल्ड गोवा ही त्यांची राजधानी होती आणि सेंट झाव्हियर यांचा मृत्यू झाल्यानंतर 1782 पासून गोव्यात शव प्रदर्शनाला सुरुवात झाली. या वर्षीच्या प्रदर्शनाची सुरुवात दिल्लीचे आर्चबिशप अनिल कौटो यांच्या नेतृत्वाखालील बॅसिलिका येथे सकाळच्या मासने होईल आणि त्यानंतर इतर दहा बिशप यामध्ये सामील होणार आहेत. दरम्यान गोव्याला विविध धर्मातील सुमारे 10,000 लोक सामील होतील अशी शक्यता वर्तवली जातेय.
एकाच इंग्रजी माध्यमानाला मिळालेल्या माहितीनुसार चांदीच्या डब्यात ठेवलेले सेंट झेवियर यांचे शव काही लोकांच्या मदतीने 50 मीटर अंतरावर असलेल्या से कॅथेड्रलमध्ये आणण्यात येतील आणि इथून पुढे हे शव इलेक्ट्रिक कॅरेजमध्ये ठेवण्यात येणार आहे.
21 नोव्हेंबर रोजी
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव जेसुइट पुजारी आणि सामान्य लोकांद्वारे बॅसिलिका प्रवेशद्वाराकडे हलविले जाईल आणि त्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने भाविकांसोबत एक भव्य मिरवणूक निघेल आणि यानंतर सेंट झेवियर यांचे शव प्रदर्शनासाठी ठेवले जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.