Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील 7 आश्रम. जिथे तुम्हाला राहता येईल मोफत; एक पैसाही.

भारतातील 7 आश्रम. जिथे तुम्हाला राहता येईल मोफत; एक पैसाही.
 

भारत हा संत महात्म्यांचा देश आहे. या देशाला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. अेक धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सण उत्सवात सामील होतात. साधू संतांचा प्रत्येकजण आदर करतो. त्यांच्या चरणी लीन होतो. या देशात साधू, संतांना मानणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे देशातील सर्वच भागात या साधू संतांचे आश्रम आहेत. विशेष म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हे आश्रम आहेत. 

या आश्रमातून अध्यात्म, योग, ध्यानधारणा आणि शिक्षण आदी गोष्टी शिकवल्या जातात. एवढेच नव्हे तर या आश्रमांमधून अनेक लोकोपयोगी आणि समाजपयोगी कामेही केली जातात. देशातील सात अत्यंत महत्त्वाचे आश्रम आहेत. या आश्रमांना आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. इथे राहणं आणि खाणं फुकट आहे. दरवर्षी हजारो भाविक या आश्रमांना भेट देत असतात.


1. गीता भवन, ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेशविषयी माहिती नाही असा एकही पर्यटक नाही. ऋषिकेशला जायचा नुसता विचारही केला तरी प्रत्येकजण तिकडे जाण्यासाठी एका पायावर तयार होतो. कारण ऋषिकेशची महिमाच तशी आहे. ऋषिकेश एक सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी दर महिन्याला लाखो पर्यटक येतात. जर तुम्ही ऋषिकेशला भेट देण्याचा विचार करत असाल, तर गीता भवनमध्ये तुम्ही मोफत राहू शकता. गीता भवन आश्रमात 1000 हून अधिक खोल्या आहेत. येथे राहण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची आवश्यकता नाही. या आश्रमात लक्ष्मी नारायण मंदीर, आयुर्वेद विभाग आणि एक पुस्तकालय आहे. येथे येणारे पर्यटक शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद घेऊ शकतात.

2. आनंदाश्रम, केरल : आनंदाश्रम, केरलच्या हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध असलेला एक अद्भुत आश्रम आहे. येथील शांतता अनुभवताना तुम्ही पक्ष्यांची किलबिल ऐकू शकता. या ठिकाणी तुम्हाला मसालेदार पदार्थ न देता घरचं साधं जेवण मिळेल, तेही फुकट. या आश्रमाचे वास्तुशिल्प ग्रामीण ढंगाचे आहे आणि हा संपूर्ण परिसर निसर्गाने वेढलेला आहे.

3. ऋषिकेश : ऋषिकेशमधील एक आश्रम जिथे शरीर आणि मनाच्या शुद्धीकरणाची पद्धत शिकवली जाते. या ठिकाणी स्वयंसेवी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तुम्ही मोफत राहू शकता. आश्रमात परदेशी पर्यटकांशी संवाद साधता येतो. त्याचबरोबर, स्वयंसेवकांना आदरपत्रही दिलं जातं.

4. ईशा फाउंडेशन, कोइम्बतूर : ईशा फाउंडेशन, कोइम्बतूरमधील वेल्लियांगिरी पर्वतांच्या कुंडलात स्थित असलेलं सद्गुरूंचा आध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या आदियोगी शिवाच्या विशाल मूर्तीसह, पर्यटकांना आत्मशांती मिळवता येते. या आश्रमात राहणे, जेवण आणि इतर सर्व सेवा मोफत आहेत. विशेषतः महाशिवरात्रिनंतर उत्सवाचे वातावरण असते.
5. श्री रामनाश्राम, तमिळनाडू : तिरुवन्नामलाईच्या डोंगर रांगेत असलेल्या श्री रामनाश्राममध्ये श्री भगवानचे मोठे मंदिर आहे. या ठिकाणी एक सुंदर बाग आणि पुस्तकालय आहे. भक्तांना येथे राहण्यासाठी शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही येथे शाकाहारी भोजनाचा आनंद घेऊ शकता. तथापि, तुम्हाला राहण्यासाठी किमान सहा आठवडे आधी बुकिंग करावी लागते.

 
6. गुरुद्वारा मणिकरण साहिब : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्थित मणिकरण येथील गुरुद्वारामध्ये तुम्ही मोफत राहू शकता. येथे लंगरची व्यवस्था केली जाते, ज्यात सर्वांना मोफत भोजन दिलं जातं. यासाठी तुम्हाला पैसे देण्याची आवश्यकता नाही.

7. आर्ट ऑफ लिविंग : आर्ट ऑफ लिविंगचे आश्रम बेंगलोर, ऋषिकेश, केरल, पुणे, आसाम आणि नागपूर यासारख्या शहरांमध्ये तसेच भारतभर विविध ठिकाणी आश्रम आहेत. त्यांचे स्वयंसेवी कार्यक्रम ‘सेवा आणि योग फेलोशिप’ म्हणून ओळखले जातात. येथे राहणाऱ्या स्वयंसेवकांना रोज किमान 5 तास सेवा कार्य करणे आवश्यक आहे. या सेवांमध्ये हाउसकीपिंग, सामग्री तयार करणे, अतिथी सेवा, बागकाम, शाकाहारी जेवण सेवा इत्यादी समाविष्ट आहेत. येथे स्वयंसेवकांना मोफत राहण्याची आणि जेवणाची सुविधा दिली जाते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.