माझ्याकडे गृहमंत्रीपद आलं तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील"
माझ्याकडे चुकून गृहमंत्री पद आलं तर महायुतीतील 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं. येत्या काळात महाविकास आघाडीचा कोणीही गृहमंत्री झाला तरी महायुतीतील नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. सामान्य लोकांचा वायपट जाणारा पैसा घर भरण्यासाठी वापरला जात असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
राम शिंदे कुणाला पण चॅलेंज करा पण पवारांना करू नका
कर्जत जामखेडमध्ये आयोजीत केलेल्या सभेत रोहित पावरांनी राम शिंदेंवर देखील जोरदार टीका केली. राम शिंदे चॅलेंज करायचे असेल कुणाला पण करा पण पवारांना करु नका असे रोहित पवार म्हणाले. कर्जत- जामखेडमध्ये IPL च्या मॅचेस होणार का? असे राम शिंदे म्हणतात, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्हाला चॅलेंज करू नका, तुम्हाला IPL चे साधे तिकीट तरी मिळते का? ते पाहा असेही रोहित पवार म्हणाले.
भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय घेतले जातील
पाच वर्षात मी या मतदारसंघात जे काम केलं तो केवळ ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है असेही रोहित पवार म्हणाले. कर्जत- जामखेडच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची दखल राज्याला घ्यावी लागली असेही ते म्हणाले. कर्जत- जामखेडचे वजन हे राज्यात वाढले आहे. भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय घेतले जातील असंही रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस पहाटे शपथविधी करतात तसेच राम शिंदेंकडे प्रवेश हे रात्रीचे होत आहेत. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो.यापुढं आम्ही गद्दारांना सोडणार नाही असेही रोहित पवार म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तर त्यांचे हात छाटण्याचे काम आम्ही करु असा इशारा देकील रोहित पवारांनी दिली.

महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील
देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदेंना सांगितले होते की, काहीही कर रोहित पवारांना मतदारसंघात अडकवून ठेव पण त्यांना ते करता आलं नाही असेही ते म्हणाले. पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं? असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विचारले होते, लोक 23 तारखेला दाखवून देतील पवार साहेबांनी काय केलं ते असेही रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा वाढल्या तर 200 पर्यंत आमचे आमदार निवडून येतील असा दावाही रोहित पवारांनी केला. मविआचे सरकार आल्यावर पहिली कॅबिनेट झाल्याबरोबर शेतकऱ्यांची 3 लाख रुपये कर्जमाफी झालेली पाहायला मिळेल असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना तर सुरू राहीलच पण "महालक्ष्मी" योजना आम्ही आणू असे ते म्हणाले. मी 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल असे रोहित पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.