Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मशीनच्या बाजूलाच पोलीस कर्मचारी गाढ झोपले जिल्हाधिकारी संतापले, 6 जणांना घरी पाठवले !

मशीनच्या बाजूलाच पोलीस कर्मचारी गाढ झोपले जिल्हाधिकारी संतापले, 6 जणांना घरी पाठवले !
 

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पण वाशिममध्ये पोलिसांच्या हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. ईव्हीएम मशीनच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी चक्क झोपी गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ईव्हीएम सुरक्षेत हलगर्जीपणा करणारे 6 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम शहरात ठेवलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. अचानक भेट देऊन ईव्हीएमच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. कारंजा इथं दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हवालदार आणि एक शिपाई हे ड्युटीवर असताना गाढ झोपलेले आढळून आले होते. तर वाशिममध्ये उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेतला असतांना दोन कर्मचारी अनुपस्थित आढळले होते.

वाशिम जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ कारवाई करत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएम सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने आधीच कडक निर्देश देण्यात आले होते. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून निवडणूक आयोगानेही अशा हलगर्जीपणाची गंभीर दखल घेतली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.