ठाणे : पायरीवर बसून मस्त गुटखा मळला तो खाल्ला आणि नंतर थेट 22 व्या मजल्यावरुन उडी घेऊन महिलेनं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली परिसरात हिरानंदानी इस्टेटमधील पेनिकल इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन महिलेनं उडी मारली.
तिने हा टोकाचं निर्णय घेण्यामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिला या इमारतीमध्ये काम करण्यासाठी आली होती. इमारतीमध्ये एका रुग्णाला मजास देण्यासाठी आली होती. तिने अॅक्सिस कार्ड वापरून 22 वा मजला गाठला. तिथे पायऱ्यांवर बसून मस्त गुटखा मळला आणि खाल्ला, नंतर या महिलेनं थेट 22 मजल्यावरुन उडी घेतली आहे.
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. रेफ्युज फ्लॅटमध्ये जाऊन तिने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा पती आणि मुलं दोघंही अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलेले आहेत. या आजारपणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या महिलेचा पती किडनीच्या आजाराने त्रस्त होता. मुलाला डोळ्याचा गंभीर आजार होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फार चांगली नव्हतीच. खर्चाकडून होणारी ओढाताण आणि मानसिक तणाव यामुळे महिला नैराश्येत होती. सततच्या या आजारपणामुळे कंटाळून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे हिरानंदानी इस्टेटमध्ये खळबळ उडाली आहे.याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल हाती आल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. पोलिसांकडून महिलेनं हे पाऊल उचलण्यामागे आणखी काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.