बिकानेर : बाळाची चाहूल हा दाम्पत्याच्या आयुष्यातला सर्वात सुखद धक्का असतो. मग 9 महिने दोघंही आतुरतेनं आपल्या बाळाची वाट पाहतात. आपलं बाळ गोड, गोंडस, गोजिरं असावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं.
त्याचा जन्म सुखरूप होण्यासाठी ते प्रयत्न करतात. आता मुलगा-मुलगी भेदही बऱ्यापैकी कमी झाल्याचं पाहायला मिळतं. आजकाल दाम्पत्य मुलगा झाला तर वंशाला दिवा मिळाला म्हणतात आणि मुलगी झाली तर घरी लक्ष्मी आली म्हणून तिचं आनंदानं स्वागत करतात. एका महिलेनं एकाच वेळी जुळ्या बाळांना जन्म दिला. ती एका मुलाची आणि एका मुलीची आई झाली. परंतु बाळांना पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तसंच कुटुंबातल्या इतर सदस्यांना मोठा धक्का बसला.
लहान मुलं प्रचंड नाजूक असतात. त्यांना जास्त हवा लागू देत नाहीत, गरम होऊ देत नाहीत. त्यांना उबदार कपड्यात बांधून ठेवतात. वेळोवेळी त्यांचं शरीर स्वच्छ करतात. त्यांची त्वचा एवढी मऊ असते की ती हातातही येत नाही. शिवाय त्यांना इन्फेक्शन लगेच होतं. परंतु या महिलेच्या बाळांची त्वचा मात्र अतिशय विचित्र दिसत होती, अगदी प्लॅस्टिकसारखी. बाळांना हात लावायलाही महिला घाबरत होती. तसंच त्यांचे डोळेसुद्धा फार भीतीदायक होते. मुलांना पाहून महिला घाबरली, किंचाळली. कोणाची त्वचा प्लॅस्टिकसारखी कशी असू शकते, असा प्रश्न तिनं ओक्साबोक्शी रडत डॉक्टरांना विचारला.
काय म्हणाले डॉक्टर?
राजस्थानच्या बिकानेर भागातील एका खासगी रुग्णालयात महिलेची प्रसूती झाली. जवळपास 2 महिन्यांपूर्वी महिलेनं बाळांना जन्म दिला. याबाबत डॉक्टर विशेष चौधरी यांनी सांगितलं, अशा बाळांचा जन्म होणं ही कदाचित देशातली पहिलीच घटना असेल. हा एक दुर्मीळ आजार आहे. कोट्यावधींपैकी एका बाळाला हा आजार होतो आणि त्यातून साधारण 3 ते 5 लाख मुलांमध्ये एखादंच बाळ जिवंत राहतं. या आजारात बाळाची त्वचा अतिशय कठीण दिसते, मात्र त्याआत त्याचं खरं शरीर दडलेलं असतं. बाळाची व्यवस्थित काळजी घेतली, स्वच्छता राखली, तर काही वर्षांनी ते अगदी ठणठणीत होऊ शकतं, एकदम नॉर्मल. परंतु अशी मुलं केवळ आठवडाभर जिवंत राहतात. अगदी काहीचजण पौगंडावस्थेपर्यंत जगू शकतात. दरम्यान, महिलेच्या मुलाचं वजन जन्मावेळी 500 ग्रॅम आणि मुलीचं वजन 530 ग्रॅम होतं. दोघांनाही पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आलं.डॉक्टरांनी पुढे सांगितलं, बाळांची त्वचा ठिकठिकाणी फाटली आहे. त्यांना हार्लेक्विन-टाइप इचिथोसिस नावाचा दुर्मीळ आजार झालाय. यात त्यांच्या डोळ्यांचा विकासही पुरेसा झालेला नसतो. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होणं आवश्यक आहे. तसंच हा आजार आई-वडिलांच्या जीन्समधून बाळांमध्ये येतो, असंही डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरुषांमध्ये प्रत्येकी 23-23 क्रोमोसोम असतात. जर दोघांचे क्रोमोसोम संक्रमित असतील, तर बाळाला इचिथोसिस होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू बाळाच्या त्वचेवर एक असामान्य थर तयार होऊन त्वचा फाटत जाते. त्यातून होणाऱ्या वेदना अतिशय असह्य असतात. या वेदना नवजात बाळांना सहन होत नाहीत आणि त्यातच ते आपला जीव गमावतात. या आजाराची काही मुलं 10 दिवसांत हे पूर्ण कवच सोडतात आणि नॉर्मल होतात, तर काही बाळांना मात्र आपला जीव गमवावा लागतो. तसंच काहीजणांना प्लॅस्टिकसारख्या कडक त्वचेसोबत जगावं लागतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.