फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको
आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवलाय. महायुतीने विधानसभा निवडणुकीत 236 जागा जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या
आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41
जागा जिंकत निवडणूक एकतर्फी केली आहे. दरम्यान,मनसेच्या एका उमेदवाराने
ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. "फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर
मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का?" असा सवाल
करत ईव्हीएममध्ये फ्रॉड झाल्याचे म्हटले आहे.
दोन-दोन दिवस झाल्यानंतर चार्जींग 99 टक्के कसं काय असू शकतं?
मनसे
दहिसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश येरुणकर म्हणाले,काही मशीनचे
चार्जिंग 99 टक्के होतं, काही मशीनचं चार्जिंग 70 टक्के तर काहींचं 60
टक्के होतं. दोन-दोन दिवस झाल्यानंतर चार्जींग 99 टक्के कसं काय असू शकतं?
मी जिथे राहतो...माझ्या घरात चार मतं आहेत. माझी आई, मुलगी, पत्नी आणि
स्वत: मी एवढं जण असून देखील मला चार मतं कशी? माझ्या आईने, मुलीने किंवा
पत्नीने मला मतदान केलं नाही का? अशा प्रकारचा सर्व घोळ आतमध्ये आहे.
गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय. या मतदारसंघात प्रत्येक जण सांगतोय की, आम्ही विद्यमान आमदाराला कंटाळलोय. ते आम्हाला नको आहेत. आम्हाला बदल करायचाय. आमच्या कार्यकर्त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत काय? असा सवालही राजेश येरुणकर म्हणाले.राजेश येरुणकर यांच्या सहकारी म्हणाल्या, निवडणुका बंद करुन टाका दरवर्षी असं होणार असेल तर अजिबात गरज नाहीये. मागील पाच वर्षांपूर्वी आमचे 5 मशीन फ्रॉड निघाले होते. यांच्याकडचे नंबर वेगळे आणि पोलिंग एजंटचे नंबर वेगळे होते. तरीही हे लोक म्हणतात. प्रोव्हिजन आहे, असंच करावे लागले. आता आम्ही आक्षेप घेतला तर अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत. असं होतं असेल तर निवडणूक रद्द करा. गणपत पाटील नगरमध्ये अजिबात कामं झालेली नाहीत. तिथे त्यांना लीड मिळतो? 163 मध्ये केवळ आमच्या उमेदवाराला फक्त दोनच मतदान पडलं. तीस वर्ष राजकारणात आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.