सांगली : सांगली विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी आज वॉर्ड क्र 15 मध्ये प्रचार बैठका, वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जयश्री पाटील यांनी नंदिनी योगा ग्रुप, लोकमान्य व्यायाम मंडळ येथे जाऊन नागरिकांशी व महिलांशी सवांद साधला. तसेच मच्छीमार्केट विक्रेत्यांशी चर्चा केली. जयश्री पाटील म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधीमंडळात मांडून ते सोडविण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरली आहे. महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. राज्यातील सत्ताधार्यांनी सातत्याने महिलांचा अवमान केला आहे. मलाही पक्षातून उमेदवारी न देता अन्याय केला गेला. नागरिकांच्या हक्कासाठी मी सदैव लढा देत राहीन, अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी नगरसेवक फिरोज पठाण, जयराज बर्गे, नंदिनी कटकोळ, मदनभाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे, किरण कांबळे, हर्षद कांबळे, शहाबाज नायकवडी, सतीश सारडा, चेतन गाडे, मिलिंद कांबळे, शरद गाडे, प्रकाश लोखंडे, नितीन सामंत यांच्यासह नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वार्डात त्यांच्या प्रचाराची धुरा जयश्री पाटील यांच्या जाऊबाई सुजिता पाटील यांनी सांभाळली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.