मुंबईतील पवईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे आदित्य पंडित नावाच्या तरूणाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडला मानसिक त्रास द्यायचा असा आरोप त्याच्यावर आहे. सृष्टी तुली असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव असून ती एअर इंडियामध्ये पायलट होती. सृष्टीने आपल्या पद्धतीने आयुष्य जगावं, कसं वागावं, काय खावं, काय प्यावं, या सगळ्याच गोष्टींसाठी आदित्य तिच्यावर दबाव टाकायचा असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. दोन वर्षं त्यांचं रिलेशन होतं. मात्र आदितयचा त्रास वाढतच होता. यावेळेस त्याने तिला तब्बल 12 दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर अखेर 13 व्या दिवशी सृष्टीने त्याला फोन केला आणि आपण आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. त्रासाला कंटाळून तिने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पंडीत आणि सृष्टी दोघे रिलेशनमध्ये होते. आदित्य सतत सृष्टीला टॉर्चर करायचा. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद व्हायचे. एकदा तर हद्दच झाली. शॉपिंगला जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातच त्याच्या कारचा अपघात झाला. मात्र त्यावेळी आदित्य तिला भररस्त्यात सोडून निघून गेला. आपल्या मैत्रिणीच्या मदतीने सृष्टी कशीबशी घरी पोहोचली. आदित्यच्या या वागण्यामुळे सृष्टी खूप दुखावली गेली, पण प्रेमात असल्याने तिने याकडे कानाडोळा केला.
नॉनव्हेज खाण्यावरूनही भांडण
एकदा त्यांच्यात नॉनव्हेजवरूनही वाद झाला कारण आदित्य पंडितला नॉनव्हेज आवडत नव्हतं. आदित्यने रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोरच सृष्टीचा अपमान केला, पण तरीही सृष्टीने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. एक ना एक दिवस आदित्य नॉर्मल वागेल, अशी तिला खात्री होती. पण काही दिवसांपूर्वीच आदित्यच्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा त्या लग्नाला जाण्यासाठी आदित्यने सृष्टीवर इतका दबाव टाकला की त्यांच्यात पुन्हा वाद झाला.12 दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक
एवढंच नव्हे तर आदित्यने सृष्टीला 12 दिवसांसाठी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलं. यामुळे सृष्टी खूप नाराज झाली. अखेर 25 नोव्हेंबरच्या रात्री तिने आदित्यला फोन केला आणि आपण आपलं आयुष्य संपवत असल्याचं त्याला सांगितलं. तिचं बोलणं ऐकून आदित्य खूप गाबरला, धावतपळत तो तिच्या फ्लॅटवर पोहोचला. पण दरवाजा आतून बंद होता. त्याने कसाबसा चावीवाला बोलावत दार उघडून घेतलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये गेल्यावर त्याला सृ्ष्टीचा मृतदेह पंख्यावला लटकलेला आढळला. आत्महत्येसाठी तिने डेटा केबलचा वापर केला.
पोलिसांनी केली अटक
तरूण मुलगी गेल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सृष्टीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मृत सृष्टी तुली यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. सृष्टीचा मृतदेह पोलिसांन ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.