रेशनकार्ड प्रकरण मिटवण्यासाठी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे मागितली दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खंडणी मागणार्यावर तहसीलदार देवरे यांनी शुक्रवारी (दि.29) तक्रार दिली आहे.
संबंधित प्रकरण मिटवून घेण्यासाठी थेट तहसीलदारांकडे खंडणी मागण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तहसीलदार यांनी तक्रार केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ज्योती देवरे यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जा नुसार तहसील कार्यालयात पुरवठा निरिक्षक अधिकारी यांच्या माध्यमातून रेशनिंग कार्ड देण्यात येतात. त्यांच्या निगरानित असलेल्या सन 2015 ते 2023 दरम्यानच्या रेशनिंग कार्डमधील एक कार्ड एका लाभार्थीला मिळाले. ते देताना संबंधित अधिकारी यांनी ऑनलाइन
चार हजार रुपये घेऊन ते कार्ड दिल्याची तक्रार एका व्यक्तीने केली. त्याचा
तपास करीत असताना तहसीलदार देवरे यांना काही कार्ड गहाळ झाल्याचे
निदर्शनास आले.
असा प्रकार घडला आहे असे समजताच संपर्क करणार्या व्यक्तीने तहसीलदार देवरे यांना मोबाइलवर मेसेज करून प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्या असा तगादा लावला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी सबंधित प्रकरणाबाबत खेड पोलिसात लेखी तक्रार दिली.त्यात खेड तहसील कार्यालयात असलेल्या पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून सुनील किसन नंदकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच कार्ड धारक महेश लक्ष्मण नेहरे यांनी 10 लाखाची मागणी केल्याबद्दल त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दिलीं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.