Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्.; भाजपच्या जाहीरनामा 10 महत्त्वाचे मुद्दे

लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्.; भाजपच्या जाहीरनामा 10 महत्त्वाचे मुद्दे
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते.

भाजपच्या संकल्पपत्रात लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील ५ वर्षात भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.