Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हीही मुलांना बिस्किट देता का? ब्रिटानियाच्या 'या' बिस्किटमध्ये काय सापडंल पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

तुम्हीही मुलांना बिस्किट देता का? ब्रिटानियाच्या 'या' बिस्किटमध्ये काय सापडंल पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
 

आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यावर एक कप चहा आणि त्याबरोबर बिस्किटे, असा नाश्ता केल्याशिवाय होत नाही. कारण- उपाशीपोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होण्याची शक्यता असते, असे तुम्हाला लहानपणापासून सांगितले जाते.

म्हणूनच आपल्याला चहासोबत काही प्रमाणात बिस्किटे खाण्याचीही सवय लागलेली असते. बरेच लोक चहा किंवा कॉफीसोबत अनेकदा बिस्किटे खातात, फक्त सकाळीच नाही, तर दिवसभरातही बिस्किटे खाल्ली जातात. पण, आता समोर आलेली घटना ऐकून तुम्हीही बिस्कीट खाताना किंवा तुमच्या मुलांना देताना १०० वेळा विचार कराल. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

तेलंगणातील कामरेड्डी गावात ब्रिटानिया बोरबॉन बिस्किटाच्या आत लोखंडी पातळ तार सापडली. त्या व्यक्तीने या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. बिस्किटामध्ये एक पातळ तार अडकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीने असा दावा केला की, तो त्याच्या मुलांसाठी बिस्किटांचा पुडा घेऊन आला होता आणि मुले बिस्किटे खात असताना एका बिस्किटामध्ये ही तार सापडली. ही घटना कामारेड्डी जिल्ह्यातील देवुनिपल्ली गावात घडली असून, व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीचे नाव हनुमान रेड्डी, असे आहे. त्या व्यक्तीने व्हिडीओमधून असा दावा केला आहे की, त्याने स्थानिक दुकानातून ब्रिटानिया कंपनीच्या बोरबॉन बिस्किटांचा पुडा विकत घेतला होता आणि मुले बिस्किटे खाताना एका बिस्किटात काहीतरी दिसले. त्यानंतर त्यांनी नीट पाहिले असता, बिस्किटामध्ये एक बारीक लोखंडी तार असल्याचे लक्षात आले. बिस्किटे आणि चॉकलेट यांसारखी उत्पादने मुले मोठ्या प्रमाणात खातात आणि या उत्पादनांमध्ये अन्नसुरक्षेची काळजी घेतली जात नाहीये ही गंभीर बाब आहे.

हनुमान रेड्डी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून, पालकांना त्यांची मुले पॅकबंद अन्न खाताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी मुलांना खाऊ देण्यापूर्वी अन्नपदार्थ काळजीपूर्वक तपासावेत, असा इशारा दिला आहे. नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही अनेक कीटक आढळून आल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. त्यामुळे आता पालकांचीही चिंता वाढली आहे.

या Site वर पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeluguScribe नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या प्रकरणी कठोर कारवाईसह उत्पादनांची गुणवत्ता तपासण्याची मागणी करीत आहेत.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.