Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! ना MBBS, ना कसलं वैद्यकीय शिक्षण; फक्त 12वी पास शेकडो तरुण थेट बनले डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये नियुक्ती

धक्कादायक!  ना MBBS, ना कसलं वैद्यकीय शिक्षण; फक्त 12वी पास शेकडो तरुण थेट बनले डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये नियुक्ती
 

जयपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे 12 वी पास शेकडो तरुण MBBS झाले नसतानाही डॉक्टर बनल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना रुग्णालयात नियुक्तसुद्धा करण्यात आलं आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राजस्थानमध्ये इतर राज्यांच्या मेडिकल काउन्सिलचं बनावट प्रमाणपत्र दाखवून शेकडो तरुणांना डॉक्टर बनवण्यात आलंय. मेघालय, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडु, महाराष्ट्र या राज्यातील तरुणांनी डॉक्टर म्हणून नोंदणी केली. ते राज्यातील अनेक ठिकाणी रुग्णांवर उपचारसुद्धा करू लागले. दरम्यान, हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खींवसर यांनी राजस्थान मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार डॉक्टर राजेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय.

जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयाचे अतिरिक्त अधीक्षक यांच्याकडे रजिस्ट्रारचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. वैद्यकीय विभागाचे प्रमुख सचिव गायत्री राठोड यांच्याकडून पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून चौकशी केली जात आहे. समितीच्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आलीय की तरुणांनी एकही दिवस एमबीबीएसचं शिक्षण घेतलेलं नाही.

तरुणांनी वेगवेगळ्या राज्यातील मेडिकल काउन्सिलचं बनावट सर्टिफिकेट सादर करून आरएमसीमध्ये नोंदणी केली. नोंदणी करताना अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी केली नाही, ना एमबीबीएसची डिग्री पाहिली. अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन १२ वी पास तरुणांची डॉक्टर म्हणून नोंदणी केली.

आरएमसी राजस्थानमध्ये नोंदणी करणारी सरकारी संस्था आहे. सरकार आणि निमसरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरएमसीमध्ये नोंदणी करण्याची गरज असते. तरुणांनी वेगवेगळ्या मेडिकल काउन्सिलच्या नावावर बनावट प्रमाणपत्र तयार करून राजस्थानमध्ये नोंदणी केली असल्याची शक्यता आहे. किंवा इतर राज्यांमध्ये मेडिकल काउन्सिलमध्ये पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतली असावीत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.