KBC मध्ये ५० लाखांसाठी सांगलीच्या मुलाला विचारण्यात आला 'तो' प्रश्न, पण दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहित आहे का?
TVवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर घालत आहे.
या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धक ही त्यांची काही स्वप्ने घेऊन येतात आणि या मंचावरून त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास करतात. नुकत्याच झालेल्या एका भागात महाराष्ट्राचे प्रशांत जमदाडे हॉट सीटवर बसले. शारीरिक आव्हाने असूनही, त्यांनी २५ लाख रुपये इतकी किंमत जिंकली. ज्याचा वापर ते त्यांच्या उपचारासाठी आणि त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी वापरणार आहेत. मात्र, ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे ते बरोबर उत्तर देऊ शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना शोमधून बाहेर पडावे लागले.
'कौन बनेगा करोडपती १६' च्या नुकत्याच झालेल्या भागात प्रशांत यांनी त्यांच्या संगोपनात आजोबांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी शेअर केले की त्याच्या आजोबांनी त्यांना व्हीलचेअरवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला होता आणि सांगितले होते की, असे केल्याने तो आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहील. बिग बींनी प्रशांत यांच्या या धाडसाचे कौतुक केले. तसंच त्यांना पुढे खेळ खेळण्यात मदतही केली. प्रश्नोत्तरांचा हा खेळ प्रशांत यांनीही अगदी उत्तम खेळत जास्तीत जास्त पैसे जिंकण्याचा प्रयत्न केला.
गेममध्ये पुढे जाताना, बिग बींनी त्यांना ५० लाख रुपयांचा प्रश्न विचारला. वेलनेस प्रशिक्षक विनय मेनन यांनी विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमच्या राष्ट्रीय संघासाठी आणि कोणत्या इंग्लिश फुटबॉल क्लबबरोबर काम केले आहे? याचे उत्तर प्रशांतला माहित नसल्याने त्यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. जाण्यापूर्वी त्यांनी पर्याय D निवडला, परंतु त्यांचे हे उत्तर चुकीचे होते. उत्तराचा योग्य पर्याय A हा होता. त्यामुळे प्रशांत यांनी २५ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून जिंकली.
दरम्यान, या जिंकलेल्या रक्कमेबद्दल प्रशांत यांनी सांगितले की, त्यांची ही पहिली कमाई आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. शारीरिक आव्हाने असूनही प्रशांत यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. परंतु नोकरी मिळण्यात त्यांना अडचण आली. जिंकलेल्या पैशाचा उपयोग ते त्यांच्या पायावर उपचार करण्यासाठी, वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी, बहिणीचे लग्न आणि धाकट्या भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वापरणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.