Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल

पुण्यात टेम्पोत सोनं,कुठून आलं-कुठे निघालं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती; IT विभागाचे अधिकारीही दाखल
 

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी एक गाडी अडवली असता, त्यात कोट्यवींची रोकड सापडली होती.

निवडणुकांच्या कामासाठीच ही रोकड पाठविण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी या रोकडचे वाहन पाहून केला होता. त्यानंतर, आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत, आता पुढील तपासणी सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता, त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टेम्पोमध्ये आढळून आलं आहे. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व 24 तास तपासणी सुरू आहे. त्यानुसार, आज सकाळी तपासणी दरम्यान, आढळून आलेल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये, पांढरे बॉक्स होते, या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दागिने असून मुंबईतून ते पुण्याच्या कार्यालयात आणले गेले आहेत. त्यामुळे, आपण आयकर विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे, अशी माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.