Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दलित विद्यार्थ्याला प्रवेश द्या; विशेष अधिकार वापरत सुप्रीम कोर्टाचे 'या' IIT ला महत्वाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

दलित विद्यार्थ्याला प्रवेश द्या; विशेष अधिकार वापरत सुप्रीम कोर्टाचे 'या' IIT ला महत्वाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
 

सुप्रीम कोर्टाने आज आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून एका विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिला आहे. एका दलित विद्यार्थ्याला फी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे भरणे शक्य झाले नाही. फी भरण्याची अंतिम मुदत संपली असल्याने त्या मुलाला आपली आयआयटी धनबाद येथील जागा गमवावी लागली. दरम्यान त्यानंतर त्या विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी न्याय मागण्याचे ठरवले. दरम्यान या विद्यार्थ्याच्या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने आयआयटी धनबादला या मुलाला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे ते, जाणून घेऊयात.

फी भरण्यासाठी १७,५०० रूपये नसल्याने उत्तर प्रदेशमधील एक दलित विद्यार्थ्याला आयआयटी धनबाद येथील प्रवेश गमवावा लागला होता. फी भरण्यासाठी त्याच्याकडे चार दिवसांचा अवधी होता. त्या मुलाचे वडील रोजंदारी मंजूर असून त्यांनी फी भरण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र पैसे जमा न झाल्याने त्याची फी भरण्याची अंतिम मुदत चुकली. त्यामुळे त्या आयआयटी धनबाद येथे प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने कायद्याची मदत मागितली.

न्याय मिळवण्यासाठी हा दलित विद्यार्थी आणि त्याचे वडील तीन महीने एससी/एसटी आयोग, झारखंड आणि मद्रास हाय कोर्टात धाव घेतली. तिथेही काही काम न झाल्याने मुलगा आणि वडिलांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या विद्यार्थ्याला आयआयटी धनबादल प्रवेश देण्याचे निर्देश दिले.

आम्ही अशा तरुण मुलांना जाऊ देऊ शकत नाही. त्याचे टॅलेंट वाया नाही गेले पाहिजे. त्यांनी न्यायासाठी अनेक ठिकाणी जावे लागळे. मात्र कुठेच काही न झाल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. "याचिकाकर्ते जे हुशार असणाऱ्या विद्यार्थी, जे वंचित गटातून येतात. ज्यांनी प्रवेश मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांना वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे या उमेदवाराला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश द्यावा असे आम्ही आदेश देतो", असे सुप्रीम कोर्ट म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात राज्यघटनेतील कलम १४२ अंतर्गत असणाऱ्या अधिकारांचा वापर केला. या अधिकारांचा वापर करून कोर्टाने अतुल कुमारला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बी. टेक कोर्समध्ये प्रवेश देण्याचे निर्देश आयआयटी धनबादला दिले. राज्यघटनेचे कलम १४२ हे सुप्रीम कोर्टाला न्यायाच्या हितासाठी कोणताही आदेश देण्याचा अधिकार देते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अतुल कुमार या विद्यार्थ्याला ऑल द बेस्ट असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.