Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

C-Voter: शिंदे-भाजप सरकार जाणार? खळबळजनक सर्व्हे आला समोर

C-Voter: शिंदे-भाजप सरकार जाणार? खळबळजनक सर्व्हे आला समोर
 

राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. बड्या नेत्यांसह इतर उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. अशातच सी-वोटच्या सर्व्हेनं खळबळ उडवून टाकली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा पराभव होईल, अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी शिंदे सरकार बदलण्याबाबत मतं व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

काहीही सांगता येणार नाही

मुंबई- या विभागातील 5.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, याबाबत काहीही सांगता येणार नाही
कोकण- कोकणातील 5.2 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, याबाबत काहीही सांगता येणार नाही.
मराठवाडा - मराठवाड्यातील 3.1 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, याबाबत काहीही सांगता येणार नाही.
उत्तर महाराष्ट्र - उत्तर महाराष्ट्रातील 3.5 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, याबाबत काहीही सांगता येणार नाही.
विदर्भ - विदर्भातील 3.9 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, याबाबत काहीही सांगता येणार नाही.
पश्चिम महाराष्ट्र - येथील 3.7 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, याबाबत काहीही सांगता येणार नाही.
एकूण 4 टक्के मतदारांचं म्हणणं याबाबत काहीही सांगता येणार नाही.
'आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला', अजित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ

राग आहे.. सरकार बदलायचं आहे
मुंबई - या विभागातील 51.2 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं आहे.
कोकण- कोकणातील 42.5 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं आहे.
मराठवाडा - येथील 52.9 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं आहे.
उत्तर महाराष्ट्र - येथील 49.8 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं आहे.
विदर्भ - येथील 51.9 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं आहे.
पश्चिम महाराष्ट्र - येथील 55.6 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं आहे.
एकूण 51.3 टक्के लोकांना वाटतंय की, सरकार बदलायचं आहे.
राग आहे पण सरकार बदलायचं नाही

मुंबई - या विभागातील 1.7 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
कोकण- कोकणातील 3.1 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
मराठवाडा - येथील 3.9 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
उत्तर महाराष्ट्र - येथील 4.1 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
विदर्भ - येथील 4.0 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
पश्चिम महाराष्ट्र - येथील 4.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
एकूण 3.7 टक्के लोकांना वाटतंय की, सरकार बदलायचं नाही.

राग नाही..सरकार बदलायचं नाही
मुंबई - या विभागातील 41.8 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
कोकण- कोकणातील 49.2 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
मराठवाडा - येथील 40.1 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
उत्तर महाराष्ट्र - येथील 42.6 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
विदर्भ - येथील 40.2 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
पश्चिम महाराष्ट्र - येथील 36.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सरकार बदलायचं नाही.
एकूण 41.00 टक्के लोकांना वाटतंय की, सरकार बदलायचं नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.