Breaking News! तर या महिला ठरू शकतात अपात्र; मिळणार नाही पैसे!
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सन्मानासाठी मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरू केली आहे. सिंगारामपूर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्याहस्ते राज्यातील 1 कोटी 29 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1574 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.
लाडकी बहीन योजना ही राज्यातील महिलांचे जीवन बदलणारी योजना आहे. योजनेतून मिळणाऱ्या पैशातून महिला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यात सक्षम झाल्या असल्याचे मुख्ममंत्री यादव यांनी सांगितले. आता मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजनेंतर्गत काही नियम केले आहेत. त्यानुसार काही महिला अपात्र ठरू शकतात. त्यांच्या बँक खात्यात पैसे येणे बंद होणार आहे.
अनेक महिला वंचित...
लाडली बहना योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक महिला प्रतिक्षेत आहेत. मात्र, सध्या नवी नोंदणी बंद आहे. आगामी काळात या योजनेत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना आणखी एक संधी मिळणार असल्याचे समजते. मात्र , आता सरकारने लाडली बहना योजनेत काही नियम आणि अटी देखील ठेवल्या आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे अत्यावश्यक आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला ही रक्कम मिळत नाही, यासाठी नियम करण्यात आला आहे.
लाडली बहना योजनेसाठी काय आहे पात्रता?
अर्जदार मध्य प्रदेशचा रहिवासी असणे आवश्यक.
ही योजना प्रामुख्याने विवाहित महिलांसाठी आहे. परंतु विधवा, घटस्फोटित महिला आणि अविवाहित महिला देखील यासाठी पात्र आहेत.
21 वर्षे आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.
योजनेचा लाभ
लाडली बहना योजनेसाठी प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1250 रुपये थेट तिच्या बँक खात्यात प्राप्त होतील. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
...तर या महिला ठरू शकतात अपात्र
स्वतःचे आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
स्वतः आणि कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता आहे.
स्वत: आणि कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही सरकारी विभाग/उपक्रम/विभाग/स्थानिक संस्थेमध्ये नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीला आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.