शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी?
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर केल्या जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी बुधवारीच जाहीर केली आहे. तर आज शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा पहिली यादी जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नाव वाचून यादी जाहीर केली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे. एकूण 45 उमेदवारांची ही पहिली यादी आहे. या यादीमध्ये बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. तर दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर आर पाटील यांनाही उमेदवारी दिली आहे.
शरद पवार गटाची यादीअनिल देशमुख - काटोलराजेश टोपे -घनसावंगीकराड उत्तर - बाळासाहेब पाटीलइंदापूर - हर्षवर्धन पाटीलमुंब्रा - जितेंद्र आव्हाडकोरेगाव - शशिकांत शिंदेवसमत - जयप्रकाश दांडेगावकरजळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकरराहुली - प्राजक्त तनपुरेशिरूर - अशोक पवारविक्रमगड - सुनील भुसाराकर्जत जामखेड - रोहित पवारअहमदपूर- विनायक पाटीलसिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणेभोकरदन - चंद्रकांत दानवेतुमसर - चरण वाघमारेकेज - पृथ्वीराज साठेबेलापूर- संदीप नाईकवडगाव शेरी - बापू पठारेरोहिणी खडसे - मुक्ताई नगरमुरबाड - सुभाष पवारघाटकोपर - राखी जाधवआंबेगाव - देवदत्त निकमबारामती - युगेंद्र पवारशेवगाव - प्रताप ढाकणेपारनेर - राणी लंकेआष्टी - महेबूब शेखकरमाळा - नारायण पाटीलसोलापुर शहर उत्तर - महेश कोठेचिपळूण -प्रशांत यादवकागल - समरजीत घाडगेतासगाव - रोहित आर आर पाटीलहडपसर- प्रशांत जगतापशिराळा - मानसिंगराव नाईकअहमदपूर - विनायकराव पाटीलसिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणेउदगीर -सुधाकर भालेरावकिनवट- प्रदीप नाईकजिंतूर -विजय भांबळेमुर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवेतिरोडा - रविकांत बोपछेअहेरी -भाग्यश्री अत्रामबदनापूर- बबलू चौधरीमुरबाड- सुभाष पवारकोपरगाव -संदीप वर्पे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.