चहामध्ये टाका 'हे' चिमुटभर पांढरं पावडर, छातीत अडकलेला कफ लगेच येईल बाहेर
भारतात जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. चहाशिवाय त्यांचा आळसच दूर होत नाही. चुकून जर सकाळी चहा मिळाला नाही तर दिवसभर ते फ्रेश राहत नाहीत.
चहाचे तसे आरोग्याला अनेक नुकसान होतात, पण तरीही लोकांना चहाची सवय लागलेली असल्याने सोडू शकत नाहीत. लोकांना असं वाटतं की, चहामुळे दिवसभर फ्रेश वाटतं आणि सायकांळच्या चहाने दिवसभराचा थकवाही दूर होतो. मात्र, डायटिशिअनचं मत आहे की, जर तुम्ही चहा पिण्याची आणि चहा बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्याल तर तुम्हाला याने नुकसान होणार नाही.
डायटिशिअननुसार, जर तुम्ही चहामध्ये चिमुटभर मीठ टाकलं तर याने चहा टेस्टी तर होतोच, सोबतच याचे आरोग्यालाही फायदे मिळतात. अनेकांना हे माहीत नव्हतं की, मीठ घातलेल्या चहाने घशातील खवखव दूर होते. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे तुमच्या घशाची समस्या दूर करतात. या चहात असलेल्या सोडिअमने कफ पातळ होऊन बाहेर पडतो आणि खोकलाही दूर होतो.
त्याशिवाय यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देतात आणि थकवा दूर करतात. मीठ टाकलेल्या चहाचं सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि गॅस्ट्रिक समस्या कमी होतात. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा ताप किंवा सर्दी होत असेल तर तुमच्यासाठी मीठ घातलेला चहा खूप फायदेशीर ठरतो.
कसा बनवाल हा चहा?
सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करा. साखर, आलं आणि दूध टाकून चांगली उकडी येऊ द्या. नंतर यात चिमुटभर मीठ टाका आणि शेवटी चहा पावडर टाकून झाकण ठेवा. आयुर्वेदानुसार चहामध्ये चहा पावडर शेवटी टाकावं आणि नंतर गॅस बंद करावा. गरमागरम चहाचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.