Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल
 

कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट घेऊन जाणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. नंतर याची निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच त्यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, टेम्पो चालक तुषार अशोक अंदे तसेच आमदार रविंद्र धंगेकर गुन्हा नोंदवला आहे.

विधानसभा निवडणूकाची आचारसंहिता गेल्याच आठवड्यात लागू झाली आहे. विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकाळात मतदारांना आमिष दाखवल्यानंतर गुन्हा नोंदवला जातो. दरम्यान, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांचे हिंदमाता प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप होत होते. या पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच एका स्थानिक कार्यकर्त्याचा फोटो छापलेला होता.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दिवाळी साहित्याचे वाटप होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा पथकाने हा टेम्पो पकडला. तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. भाजप कार्यकर्ये देखील टेम्पो पकडताना उपस्थित होते. दरम्यान, भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी नंतर रविवारी रात्री याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानूसार भारतीय न्याय संहिता कलम १७०(१) (आय), १७३, १२३(१) (ए) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.