बापरे..! महाविकास आघाडी फुटणार?
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटून बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन वेगवेगळ्या भागात वाटल्या गेली.
सध्या जागा वाटपामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. काही जागांवर मतभेद असले तरी ते सामोपचाराने सोडवण्याचे तंत्र आणि मंत्र त्यांनी अवलंबला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तीव्र मतभेद समोर आलेले आहेत.अश्यात अगदी थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. पण त्यापूर्वीच शिवसेनेच्या एका जुन्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे. उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल, असा गौप्यस्फोट कोकणातील या नेत्याने केला आहे.
उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल असा खळबजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. उध्दव ठाकरे, नाना पटोले मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार हे दोन्ही पक्षांना संपवतील, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.