Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला

मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
 

तर प्रांतातून मुंबईत येणाऱ्यांची एक क्रेझ म्हणजे स्टार्सचे बंगले पाहण्याचीही. शाहरुख खानचा बंगला मन्नत, अमिताभ बच्चन यांचा जलसा, प्रतीक्षा आणि सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंट असे काही बंगले आहेत ज्याबाहेर गर्दी जमते.

काही वर्षांपूर्वी असाच एक बंगला होता आशीर्वाद, ज्यात राजेश खन्ना राहत होते. हा बंगला शापित मानला जात होता, त्यानंतरही तीन बडे सेलिब्रेटी त्यात राहिले आणि उद्ध्वस्त झाले. यानंतर भुताचा बंगला म्हणून त्याची ओळख अधिक पक्की झाली.

उद्ध्वस्त झालेला भारत भूषण

राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद' हा बंगला एका अँग्लो-इंडियन कुटुंबाचा होता. हा बंगला विकत घेणारे पहिले बॉलिवूड सेलिब्रिटी होते भारत भूषण. कार्टर रोडवर अरबी समुद्राच्या शेजारी हा बंगला आहे. भारत भूषण यांनी या बंगल्यात शिफ्ट होण्यापूर्वी बैजू बावरा, मिर्झा गालिब, गेट वे ऑफ इंडिया, बरसात की रात असे अनेक मोठे सिनेमे केले होते. बड्या स्टार्सशी त्यांची स्पर्धा होती. या बंगल्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्याचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले. आणखी काही वर्षांनी भारत भूषण यांचे स्टारडम संपुष्टात आले आणि ते कर्जात बुडाले. भारत भूषण यांनी हा बंगला विकला. त्यानंतर हळूहळू हा बंगला खंडरसारखा दिसू लागला. लोक त्याला शापित समजू लागले.

राजेंद्र कुमार यांनी १९६० साली केला खरेदी

१९६० मध्ये राजेंद्र कुमार यांना या बंगल्याची माहिती मिळाली. राजेंद्र कुमार यांनी हा बंगला उत्तम ठिकाणी असल्यामुळे तसेच अगदी स्वस्त दरात मिळत असल्यामुळे खरेदी केला. मनोज कुमार यांच्या सल्ल्यानुसार बंगल्याचे नाव डिंपल असे ठेवण्यात आले होते. राजेंद्र कुमार यांच्या मुलीचे नाव डिंपल होते. बंगल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून राजेंद्र यांनी राहायला येण्यापूर्वी पूजा घातली. बंगल्यात गेल्यानंतर राजेंद्र कुमार यांना १९६८-६९ मध्ये यश मिळालं, त्यानंतर त्यांचाही वाईट काळ सुरु झाला. त्यांनी आपल्या मुलासोबत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. पण हे सिनेमे फ्लॉप ठरले. अखेर त्यांच्याकडेही पैशांची कमतरता भासू लागली.

राजेश खन्ना यांनी ७० च्या दशकात राजेंद्र कुमार यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता. हा बंगला खरेदी केला तेव्हा राजेश खन्ना यांचे करिअर यशाच्या शिखरावर होते. त्यांनी जवळपास १७ हिट चित्रपट दिले होते. त्यावेळी ते सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही असे बोलले जात होते. १९७५ साली राजेश खन्ना यांचे सिनेमे अपयशी ठरू लागले आणि हळूहळू त्यांच्या जागी अमिताभ बच्चन आले. आर्थिक अडचणींबरोबरच राजेश खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अडचणी येऊ लागल्या. ते डिंपलपासून वेगळे झाले. राजेश खन्ना यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते आणि ते २०११ पर्यंत याच बंगल्यात राहत होते. यानंतर हा बंगला शापित आहे, असा लोकांचा विश्वास दृढ झाला. २०१४ मध्ये एका उद्योगपतीने हा बंगला विकत घेतला आणि दोन वर्षांनी तो पाडण्यात आला.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.