Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फळं समजून खाल्लं असं काही, डोकं सटकलं अन् कुऱ्हाडीने कापलं स्वत:चं गुप्तांग!

फळं समजून खाल्लं असं काही, डोकं सटकलं अन् कुऱ्हाडीने कापलं स्वत:चं गुप्तांग!
 

ऑस्ट्रियामधील एका व्यक्तीने कुऱ्हाडीच्या मदतीने आपलंच गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने असं कोणत्या कारणाने केलं तेही तेवढंच धक्कादायक आहे. या व्यक्तीने मॅजिक मशरूम म्हणून ओळखलं जाणारं सिलोसायबिन मशरूम खाल्लं होतं.

ज्यानंतर त्याने हा कारनामा केला. अकॅडमिक मॅगझीन मेगा जर्नल ऑफ सर्जरीमध्ये रिपोर्ट करण्यात आलेली ही अशी पहिलीच घटना आहे. सिलोसायबिन ट्रिगर सेल्फ-म्यूटिलेशन आहे आणि मानसिक समस्यांची इतिहास असलेल्या लोकांसाठी यातील तत्व घातक ठरतात. 

मशरूम खाल्ल्यावर सटकलं डोकं

न्यूयॉर्क पोस्टनुसार, डिप्रेशनमध्ये असलेल्या या व्यक्तीने दारूच्या नशेत घरी एकटाच असताना चार ते पाच वाळलेले सिलोसायबिन मशरूम खाल्लेत. मशरूम खाल्ल्यावर तो भ्रमित झाला. त्याचं डोकं फिरलं आणि त्याने कुऱ्हाडीने त्याच्या गुप्तांगाचे तुकडे केले. 

ब्लड फ्लो रोखण्यासाठी त्याने एक कपडा गुंडाळून घेतला. तर गुप्तांगाचे कापलेले तुकडे त्याने बर्फासोबत एका भांड्यात ठेवले. रक्त माखलेल्या स्थितीत तो घराबाहेर निघाला. रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीने त्याला पाहिलं आणि त्याने अ‍ॅम्बुलन्स बोलवली. घटनेच्या ५ तासांनंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
माती आणि बर्फाच्या इन्फेक्शनमुळे डॉक्टरांना त्याच्यावर उपचार करण्यात जरा अडथळा आला. त्याच्यावर सर्जरी करून कापलेलं गुप्तांग जोडण्यात आलं. त्यानंतर त्याला मनोरूग्ण विभागात ठेवण्यात आलं. त्याचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी काही औषधं देण्यात आलीत.

हळूहळू तो सामान्य स्थितीत आला तेव्हा समजलं की, त्याचं मानसिक आरोग्य ठीक नाही. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. या घटनेमधून हे समोर आलं की, सिलोसायबिन मशरूमचं केल्याने डोक्यावर परिणाम होऊ शकतो.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.