बॉम्ब अलर्ट, बुलेट प्रुफ आणि... धमक्यांदरम्यान सलमान खानने खरेदी केली हायटेक कार, किंमत कोट्यवधीत
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात नव्या लक्झरी कारचा समावेश झाला आहे. ही कार बुलेटप्रुफ आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची आणखी कडक करण्यात आली आहे.
सलमान खानच्या जुन्या कारमध्येही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची सुरक्षाव्यवस्था असतानाही हत्य करण्यात आली होती. याची जबाबदरी बिश्नोई गँगने घेतली. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानची नवी कार आणि फिचर्स
'फ्री प्रेस जरनल'ने दिलेल्या रिपोर्नुसार सलमान खानने नवी बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. निसान (NISSAN) या कंपनीची ही पेट्रोल SUV असून टॉप क्लास मॉडेल आहे. ही कार सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच बनवण्यात आली आहे. कारमध्ये बॉम्ब अलर्टसारखे फिचर्स आहेत. या कारच्या काचेतून बंदुकीची गोळी आर-पार जाऊ शकत नाही. प्रायव्हसीचा विचार करुन कारचा रंग गडद आहे. सलमानकडे याआधीही निसान कंपनीची बुलेटप्रुप कार आहे. या कारचा नंबर 2727 असा आहे, हा नंबर सलमानच्या वाढदिवसाशी जोडलेला आहे.
सलमानच्या सुरक्षेत वाढ
सलमान खानच्या सुरक्षाव्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सलमान बिग बॉसच्या सेटवर शुटिंगसाठी पोहोचला. रिपोर्टनुसार सलमानच्या सुरक्षेत 60 जवान तैनात आहेत. इतकंच नाही तर कार्यक्रमात येणाऱ्या लोकांना आधारकार्डशिवाय एन्ट्री दिली जात नाही. 'बिग बॉस 18' च्या कर्मचाऱ्यांना कार्यक्रम संपेपर्यंत आपल्या जागेवरुन उठण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सलमान खानला पुन्हा धमकी
सलमान खानला वारंवारी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आता नव्याने आलेल्या धमकीत लॉरेन्स बिश्नोईशी समझोता करण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी सलमानकडे करण्यात आली आहे. यानंतर सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत सलमानने शुटिंगला सुरुवात केली आहे.
सलमानला कोणाकडून धोका?
1998 मध्ये जोधपूर इथं झालेल्या काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यात हे प्रकरण जास्तच तापलं आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर गोळीबारही करण्यात आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.