Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखिलेश यांचे ऐकून नितीश कुमार सरकारचा पाठिंबा काढणार? आजचा दिवस का महत्वाचा?

अखिलेश यांचे ऐकून नितीश कुमार सरकारचा पाठिंबा काढणार? आजचा दिवस का महत्वाचा?
 
 
उत्तर प्रदेशातील जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल सेंटरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्रे लावून सेंटर बंद करण्यात आल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आले.

त्यानंतर त्यांनी घराबाहेर रस्त्यावर येत जयप्रकाश नारायण यांना आदरांजली वाहिली. जयप्रकाश नारायण यांची आज जयंती आहे. अखिलेश यांना सेंटरमध्ये जाऊन आदरांजली वाहायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना जाऊ दिले नाही. अखिलेश यांच्या लखनऊमधील घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांना सेंटरमध्ये जाऊ देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी घराबाहेरील रस्त्यावर मुर्ती आणत तिथेच हार घातला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना साकडे घातले.

मीडियाशी बोलताना अखिलेश म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आले आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे जे सरकार त्यांच्या जयंतीचा सन्मान करत नाही, त्या सरकारशी असलेली आघाडी नितीश कुमारांनी लगेच तोडायला हवी, असे आवाहन अखिलेश यांनी केले आहे.

केंद्रात तसेच बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत आहेत. एनडीएचे सरकार आल्यानंतर नितीश कुमार कधीही बाहेर पडू शकतात, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. आता जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी अखिलेश यांनी नितीश कुमारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे आता त्यावर नितीश कुमार काय बोलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, अखिलेश यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले, भाजपने सेंटरचे काम थांबवले आहे. आम्ही तिथे जाऊन आदरांजली वाहू नये, यासाठी सरकार आम्हाला थांबवत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावरच आदरांजली वाहिली. जागतिक दर्जाचे सेंटर विकण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचा आऱोप अखिलेश यांनी केला.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.