विधानसभेचं बिगुल वाजलं! तुमच्या मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी कधी? वाचा वेळापत्रक
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार आहे.
तर राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
निवडणुकीचं वेळापत्रक
महाराष्ट्रात 20 नोेव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्यातील मतदारसंघ आणि मतदारांची माहिती
महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघ 288 असून त्यातील सर्वसाधारण मतदारसंघांची संख्या इतकी आहे. 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये 4.95 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.46 कोटी महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 इतकी आहे तर दिव्यांग मतदारांची संख्या 6.32 लाख इतकी आहे.
85 वर्षांवरील मतदारांची संख्या 12.48 लाख इतकी आहे तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 49034 इतकी आहे. 18-19 वर्षांच्या आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.